गटारीमुळे कल्याण-डोंबिवलीत खड्डेभरणीचे काम बंद – eNavakal
News महाराष्ट्र

गटारीमुळे कल्याण-डोंबिवलीत खड्डेभरणीचे काम बंद

डोंबिवली- आज गटारी असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत खड्डेभरणीची काम बंद आहे, असे बेजबाबदार स्पष्टीकरण कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी केले आणि एका नव्या वादाला तोंड फुटले. मुळात किती व कोणत्या रस्त्यांवर खड्डे पडले होते? त्यातले किती बुजविले व किती बाकी? व रस्ते नक्की खड्डे मुक्त होणार आहेत का? याबाबत करदात्या नागरिकां इतकेच आयुक्तांनाही अंधारात ठेवण्यात यंदादेखील पालिकेचे कामचुकार अधिकारी यशस्वी झाले असल्याचे महासभेत स्पष्ट झाले. पाच निष्पाप नागरिकांचे बळी व अनेक गंभीर होऊन देखील बेपर्वाईने चालढकल करुन व फक्त पाट्या टाकून दिवस भरणार्‍या सर्व अधिकारी वर्गाला स्वेच्छा निवृत्ती देऊन घरचा रस्ता दाखवा, अशी जोरदार मागणी सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केली.आणि शुक्रवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला खड्ड्यांवरून चांगलेच धारेवर धरले.

कल्याण-डोंबिवलीत खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झाले असून आत्तापर्यंत पाच बळी गेले आहेत. यावरून मागच्या महासभेत प्रचंड गदारोळ झाला होता. शेवटी ही महासभा तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब महासभा शुक्रवारी सुरू झाली. या सभेत पुन्हा एकदा सगळ्याच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत खड्डेभरणी सुरू नसल्याचा आरोप केला. त्यांना उत्तर देताना आयुक्तांनी आज गटारी असल्यानं काम बंद असल्याचं अजब आणि धक्कादायक कारण दिलं. मुळात अनेक रस्त्यावर खड्डे भरलेच नसून ते वाढले आहेत
हे वास्तव आहे.

महासभेत सुरुवातीला विरोधी पक्षात असलेल्या मनसेनं सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. मागील सभेत राजदंड पळवणारे मनसे गटनेते प्रकाश भोईर यांचं महापौरांनी एका महासभेसाठी निलंबन करत असल्याची घोषणा केली, यावरून मनसेनं शिवसेनेला धारेवर धरत सभागृहात ठिय्या आंदोलन करणार्‍या उपमहापौर उपेक्षा भोईर यांचंही निलंबन करण्याची मागणी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याच्या मुदतीत वाढ

नांदेड – राखीव जागेवर निवडून आलेल्‍या उमेदवारांनी त्‍यांचे जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्याऐवजी बारा महिण्‍यात सादर करण्‍याबाबत अद्यादेश जारी करण्‍यात आला आहे. सदर सुधारणा अद्यादेशामुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच शिवसेना नेतृत्वाला अल्टीमेटम?

मुंबई – केंद्रात आणि राज्यात युतीत असलेल्या शिवसेनेने अनेकवेळा भाजपवर टीका करत एकला चलो रे, ची साद दिली आहे.  मात्र, आज भाजप पक्षश्रेष्ठीनीच शिवसेनेची कोंडी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More