‘गच्ची’चे मोशन पोस्टर लॉंच ! – eNavakal
मनोरंजन मुंबई

‘गच्ची’चे मोशन पोस्टर लॉंच !

मुंबई- लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित ‘गच्ची‘  हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रिया बापट आणि अभय महाजनची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर मोशन पोस्टर लाँच करण्यात आला. प्रिया बापटचा आवाज लाभलेल्या या मोशन पोस्टरमध्ये प्रिया ‘गच्ची’ ला संबोधून बोलत असलेले दिसून येते. जीवनाची अविभाज्य घटक बनलेली ही ‘गच्ची’ किती खास आहे, याची जाणीव तिच्या या आवाजातून होते.  वाढत्या शहरीकरणाच्या युगात दोन घटका निवांत वेळ घालवण्याची हक्काची जागा म्हणजे गच्ची ! बालपणाच्या अनेक आठवणींची साक्ष असलेल्या या ‘गच्ची’सोबत अनेकांचे भावनिक ऋणानुबंध जोडले गेले आहेत. अशी ही प्रत्येक वयोगटातील लोकांना हवीहवीशी वाटणारी जागा, आता सिनेमाच्या रुपात लोकांसमोर येत आहे.  नचिकेत सामंत  यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More