गंगा बचावासाठी उपोषणाला बसलेल्या स्वामी सानंद यांचे निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

गंगा बचावासाठी उपोषणाला बसलेल्या स्वामी सानंद यांचे निधन

ऋषिकेश – पवित्र गंगा प्रदूषणमुक्त व्हावी, या मागणीसाठी गेल्या १११ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या पर्यावरणवादी प्रा. जी. डी. अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञान स्वरूप सानंद यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने एम्स रुग्णालयात निधन झाले.

स्वामी सानंद कानपूर आयआयटीमध्ये प्राध्यापक होते. त्यानंतर केंद्रिय पर्यावरण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. बुधवारी रात्री त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना बुधवारी रात्री हरिद्वार येथून एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. स्वामी सानंद यांनी १११ दिवस उपोषण केले. यादरम्यान पाण्यात मध मिसळून केवळ त्याचे सेवत ते करत होते. गेले दोन दिवस त्यांनी पाणीही त्यागले होते.

ह्या होत्या मागण्या – 
अवैध रेती उपसा, बंधारे, बेसुमार प्रदूषण या जोखाडातून गंगेला मुक्त करावे, या मागणीसाठी स्वामी सानंद उपोषणाला बसले होते. ‘गंगा बचाव’साठी विविध मुद्द्यांवर स्वामी सानंद यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा बनवण्याची मागणी केली होती. त्या पत्रावर कोणतंही उत्तर न मिळाल्याने स्वामी सानंद २२ जूनपासून उपोषणाला बसले होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती यांनी स्वामी सानंद यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती मात्र त्यांनी ती विनंती धुडकावली होती.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ

जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. १४ एप्रिल १९२२ साली झाला. अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील...
Read More
post-image
दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक! २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

अनंतनाग – जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये मागील २४ तासांत दुसरी चकमक झाली असून जवानांनी वघामा भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुंबई – काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे भाजपने गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

साध्वी प्रज्ञाने शपथ घेताना गुरुचे नाव घेतल्याने गदारोळ

नवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

डॉक्टरांच्या संपामुळे तब्बल ४० हजार शस्त्रक्रिया रद्द

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांना पाठींबा देण्यासाठी काल देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या संपात विविध राज्यांतील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले....
Read More