‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव घेऊन येताहेत ‘हैद्राबाद कस्टडी’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव घेऊन येताहेत ‘हैद्राबाद कस्टडी’

मुंबई – सुपरहिट ‘बबन’ नंतर द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘हैद्राबाद कस्टडी’ असे असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरद्वारे त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या सिनेमाच्या नावावरून आणि टीझर पोस्टरवरून हा सिनेमा पोलीस कोठडी आणि कैद्यांवर आधारित असल्याचा अंदाज येतो. शिवाय, या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर, थर्ड डिगरीसाठी वापरण्यात येणारा पट्टादेखील पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. इतकेच नव्हे तर, हैद्राबाद कस्टडी असे या सिनेमाचे नाव असल्याकारणामुळे, हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे? असा प्रश्नदेखील प्रेक्षकांना पडत आहे. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता अटक

मुंबई,  – खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेल्या एका 45 वर्षांच्या संशयित आरोपीस पुणे एटीएसने अटक केली आहे. त्याचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे काही पुरावे एटीएसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More