भाजपा खासदार गोपाळ शेट्टींचे राजीनामानाट्य – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

भाजपा खासदार गोपाळ शेट्टींचे राजीनामानाट्य

मुंबई – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांचा सहभाग नसल्याच्या भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. गोपाळ शेट्टींच्या या वक्तव्याबद्दल पक्षनेतृत्वाने झापल्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, पण भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेट्टींनी आपला राजीनामा मागे घेतला. अशा प्रकारे शेट्टींनी त्या वादग्रस्त वक्तव्यावर राजीनामानाट्य पार पाडले. मुंबईतील मालवणी येथे शिया कब्रस्तान कमिटीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात गोपाळ शेट्टी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील विविध समाजाच्या योगदानाबद्दल वक्तव्य केले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू आणि मुस्लीम खांद्याला खांदा लावून लढले होते, मात्र ब्रिटिश लोक देशावर राज्य करत असल्याने ख्रिश्चनांचा या लढ्यात सहभाग नव्हता, असे शेट्टी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादाचा धुरळा उडाला. विरोधकांनी भाजपला घेरले. यावरून पक्षनेतृत्वाने शेट्टी यांची कानउघडणी करत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे नाराज झालेल्या शेट्टी यांनी कोणत्याही पदापेक्षा मला व्यक्तिस्वातंत्र्य महत्वाचे आहे. वाणीवर गदा आणणारे पद मला नको आहे. पक्षाने सांगण्याआधी मी राजीनामशा द्यायला तयार आहे. लवकरच मी माझा निर्णय जाहीर करेन, असे म्हणत शेट्टी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शाळा सुरू होत नाही तोपर्यंत फी भरू नका – शिक्षणमंत्री

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक शाळा-महाविद्यालयांकडून पालकांकडे फीची मागणी होत आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

ठाणे भाजी मार्केट हलवणार

ठाणे – भाजीपाला, अन्नधान्याची दुकाने २४ तास सुरू राहतील अशा सूचना सरकारने वारंवार देऊनही अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता...
Read More
post-image
मुंबई

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे पाच संशयित, परिसर सील

मुंबई – देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे ४ संशयित आढळले...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘हळद’ म्हणजे सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय

आपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये पहिल्यांदा हळद घालतो. हळद हा स्वयंपाकघरातील एक उत्तम आयुर्वेदीक पदार्थ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पाकिस्तानचा उद्दामपणा! सरकारकडून फक्त मुस्लिमांना मदत, हिंदूना डावललं

इस्लामाबाद – लाखो लोकांची चिंता वाढवणारा आणि हजारो लोकांचे प्राण घेणारा कोरोना व्हायरस जगातील प्रत्येक देशात थैमान घालतोय. पाकिस्तानातही या विषाणूने हातपाय पसरले आहेत....
Read More