क्रीडा मुंबई

खो-खो : पश्चिम-मध्य रेल्वे संघ संयुक्त विजेते

मुंबई -दादरच्या केशवराव दाते उद्यानात सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेत व्यावसायिक गटात पश्चिम-मध्य रेल्वे संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. उभय संघातील अंतिम फेरीचा सामना चांगलाच रेंगाळला आणि बरोबरीत सुटल्याने तसेच रात्री बराच उशीर झाल्यामुळे आयोजकांनी शेवटी संयुक्त विजेते घोषित केले. दोन्ही संघांनी 10-10 गुणांची बरोबरी साधली. पश्चिम रेल्वेच्या अमित पाटील, अमोल जाधव, प्रसाद राडिए, रंजन शेट्टीने शानदार खेळ केला. तर मध्य रेल्वेच्या मिलिंद चावरेकर, विजय हजारे, दिपेश मोरे चमकले. महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवनेरीने श्री समर्थला अवघ्या 2 गुणांनी चकविले. अक्षया गावडेच्या शानदार संरक्षणामुळे शिवनेरीने बाजी मारली. तिने पाच आणि सहा मिनिटे पलटीचा खेळ केला. तिला दर्शना सपकाळ अमृता भगतने चांगली साथ दिली.
दुसर्‍या सामन्यात महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने अमरहिंद मंडळाला सहज नमविले. विजयी संघाच्या साक्षी वाफेलकर, मिताली बारसकर, नेहा नवरत्नेने छान खेळ केला. पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्री सह्याद्रीने महात्मा गांधीला आणि ओम समर्थ भारत व्यायाम मंडळाने प्रबोधन क्रीडा मंडळाचा पराभव केला. श्री सह्याद्रीचे सिद्धेश कदम दुर्वेश साळुंखे तर ओम समर्थचे सनी तांबे, अभिषेक काटकर चमकले.

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अपघात विदेश

पेरू देशात दरीत बस कोसळून 44 जणांचा मृत्यू

लीमा – पेरूच्या अरेक्विपा मध्ये  एक बस डोंगर दरीत कोसळली. या भीषण अपघातात 44 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे . तसेच 24 जण जखमी आहे. त्यातही 3 चिमुकल्यासंह...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकारण

शिवसेनाही परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार

बीड – नेहमीच राज्याचे  लक्ष लागून असते  त्या परळी विधानसभेची निवडणूक यावेळी शिवसेनाही लढणार आहे. ”निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला...
Read More
post-image
देश राजकारण संरक्षण

लष्करप्रमुखांनी राजकीय विषयात हस्तक्षेप करू नये- असुदद्दीन ओवेसी

नवी दिल्ली- बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमातून आसामच्या राजकीय हालचालींन बाबत वक्तव्य केले होते, या वक्तव्याचे प्रतिउत्तर देत, लष्करप्रमुखांनी राजकीय विषयात हस्तक्षेप करू नये असे...
Read More
post-image
न्यायालय विदेश

नवाझ शरीफांची पक्षप्रमुख पदावरून न्यायालयाने केली हकालपट्टी

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानेही नवाझ शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएलएम)पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शरीफ यांना गेल्या वर्षी न्यायालयाने पदच्युत केले होते. पंतप्रधानपदावरून...
Read More