खुशखबर ! 36 हजार पदांसाठी ‘या’ महिन्यातच जाहिरात ! – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र लेख

खुशखबर ! 36 हजार पदांसाठी ‘या’ महिन्यातच जाहिरात !

मुंबई – 31 जुलै अखेरपर्यंत कृषी आणि पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात निघणार आहे. त्यांच्या विभागाच्या विभागप्रमुखांनी 17 जुलैपर्यंत रिक्त पदांची माहिती राज्य सरकारला कळवायची आहे. त्यानंतर महिना अखेरपर्यंत सर्व पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. महत्त्वाचं जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी होणार आहेत.

▪ सरकारी नोकरी – पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

▪ सरकारी नोकरी – राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागाच्या नोकरभरतीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

▪ सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत.

कशी असेल परीक्षा?

भरतीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि राज्य स्तरावर त्यांच्या विभागाचे प्रमुख यांची समिती असेल. यासाठी परीक्षा पद्धती निश्चित झाली आहे. परीक्षेसाठी त्यांच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, स्थानिक बाबींवर 25 टक्के गुण असतील. गट क आणि गट ब या संवर्गातील सर्व रिक्त पदांसाठी भरती होईल. सर्व परीक्षांसाठी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा होणार. दहा जुलैपर्यंत सर्व रिक्त जागांची माहिती राज्य सरकार संकलित करत आहे.
यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.

📌 कोणत्या विभागात किती पदे भरणार?

ग्रामविकास विभाग – 11 हजार 5 पदे
आरोग्य विभाग – 10 हजार 568 पदे
गृह विभाग – 7 हजार 111 पदे
कृषी विभाग – 2 हजार 572 पदे
पशुसंवर्धन विभाग – 1 हजार 47 पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे
जलसंपदा विभाग – 827 पदे
जलसंधारण विभाग – 423 पदे
मत्स्यव्यवसाय विकास विभाग – 90
नगरविकास विभाग – 1 हजार 664 पदे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More
post-image
क्रीडा

रोहित शर्माचे सर्वाधिक षटकार

नवी दिल्ली – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चांगली फलंदाजी करणार्‍या कर्णधार रोहित शर्माने षटकारांच्या बाबतीत आणखी एक विक्रम केला. गेल्या 10 वर्षात रोहितने सातत्याने...
Read More
post-image
क्रीडा विदेश

फेडरर-जोकोव्हिच जोडी पराभूत

शिकागो – लेवर चषक सांघिक टेनिस स्पर्धेत युरोप विरुद्ध अमेरिका यांच्यातील लढतीत पहिल्या दिवशी युरोप संघाने 3-1 अशी मोठी आघाडी घेतली आहे. टेनिसमधील दिग्गज...
Read More