खुल्या प्रवर्गातील नियुक्त्या रद्द! अध्यादेशाला हायकोर्टाची स्थगिती – eNavakal
News मुंबई

खुल्या प्रवर्गातील नियुक्त्या रद्द! अध्यादेशाला हायकोर्टाची स्थगिती

मुंबई – पाच वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या सेवेत मराठा कोट्यातील रिक्त ठेवलेल्या विविध पदांवर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला उच्च न्यायालयाने अखेर आज स्थगिती दिली.
न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने ही स्थगिती देताना पुढील सुनावणी पर्यंत कोणत्याही कर्मचार्‍यांना कामावरून काढू नका अथवा रिक्त झालेली पदे भरू नका असे निर्देश राज्य सरकारला देत याचिकेची सुनावणी 5 डिसेंबर पर्यंत तहकूब ठेवली.ो मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखविला. त्यानंतर राज्य सरकारने मराठा कोट्यातील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात आलेल्या खुल्या प्रवर्गातील नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला .तसा अध्यादेश 11 जुलै 2019 ला जारी केला. या अध्यादेशाला ऑगस्ट ला आव्हान देण्यात आले होते .त्यावेळी राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात नव्याने अध्यादेश काढण्यात येणार असल्याने तूर्तास खुल्या प्रवर्गातील कोणत्याही कर्मचार्‍यांची सेवा खंडित केली जाणार नाही अशी हमी दिली होती.
दरम्यान सरकारने सुमारे 417 कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या रद्द केल्यामुळे प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील 15 कर्मचार्‍याच्यावतीने अँड गुणरतन सदावर्ते तसेच रणजित बीराण्जे यांच्यावतीने यतीन मालवणकर यांनी याचिका दाखल केल्या होत्या त्या याचिकावर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्याच्या वतीने अँड अनिल अंतूकर यांनी युक्तिवाद केला. राज्य सरकारने न्यायालयात हमी दिलेली असताना जुन्या अध्यादेशाची अंमलबजाणी करन्यास सुरुवात केली आहे. 417 कर्मचार्‍यांना सेवेतून मुक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वलक्षित प्रभावाने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास मनाई केलेली असताना आणि न्यायालयात हमी देऊनही केलेली कारवाई बेकायदा असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची न्यायालयाने दखल घेत मराठा आरक्षण लागू झाल्याने खुल्या प्रवर्गातील जुन्या नियुक्त्या रद्द करण्याच्या अध्यादेशाला स्थगिती देताना पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही कर्मचार्‍यांना कामावरून काढू नका अथवा रिक्त झालेली पदे भरू नका, जैसे थे स्थिती ठेवा, असे निर्देश राज्य सरकारला दिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

सीमेवरील तणाव चीनमुळेच! भारत-चीन वादात अमेरिकेचीही उडी

वॉशिंग्टन – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात एका रात्रीत आढळले ३८ कोरोना रुग्ण

सातारा – सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार थांबता थांबेना. काल जिल्ह्यात एका रात्रीत तब्बल ३८ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे....
Read More
post-image
देश

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, दसऱ्याला ६० हजारांवर जाणार

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे नवी दिल्लीत सोन्याचा भाव प्रति तोळा ६४७ रुपयांनी वाढून तो ४९,९०८...
Read More
post-image
देश

पोलीस कोठडीतील पिता-पुत्राच्या मृत्यूबद्दल तामिळनाडूच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

चेन्नई – तामिळनाडू राज्यातील तुतिकोरीन शहरातील पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स या पिता-पुत्रांना पोलीस कोठडीत मरेपर्यंत अमानुष मारहाण आणि अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याप्रकरणी...
Read More
post-image
कोरोना देश

केरळमध्ये ५२ सीआयएसएफ जवानांना कोरोना लागण

तिरुवअनंतपुरम – गेल्या दोन आठवड्यांमध्ये केरळच्या कण्णूरमधील तब्बल ५२ सीआयएसएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच सीआयएसएफ दलात खळबळ उडाली. त्यामुळे सर्व जवानांना विलगीकरणात ठेवण्यात...
Read More