‘खिलजी’नंतर रणवीर साकारणार ‘ही’ ऐतिहासिक भूमिका – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘खिलजी’नंतर रणवीर साकारणार ‘ही’ ऐतिहासिक भूमिका

मुंबई – बॉलिवूडमध्ये वेगळ्या भूमिका साकारण्यासाठी महत्व देणारा अभिनेता रणवीर सिंग लवकरच अजून एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. रणवीरने साकारलेल्या अल्लाउद्दीन खिल्जीच्या व्यक्तिरेखेला सर्वांनीच मनापासून दाद दिली. ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’नंतर रणवीर सिंह ‘तख्त’ असे या चित्रपटाचे नाव असून यात रणवीर औरंगजेबची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

दिग्दर्शक करण जोहर याने त्याच्या आगामी चित्रपटाची जाहीर घोषणा केली आहे. या चित्रपटाविषयी खास बाब म्हणजे चित्रपटात रणवीर सिंग, करीना कपूर खान, आलीया भट्ट, विकी कौशल, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर एकत्र दिसणार आहेत. इतकी बलाढ्य स्टार कास्ट असणाऱ्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘तख्त’ असे असणार आहे. रणवीर जहाँनाराच्या मोठ्या भावाची म्हणजे औरंगजेबची भूमिका करणार आहे. जहाँनाराला दोन भाऊ होते. औरंगजेब आणि दारा शिकोह. रणवीर सिंगचा अभिनय आणि करण जोहरचे दिग्दर्शन ही जोडी प्रथमच पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २०२० साली चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. इतकी ताकदवान टीम आहे म्हणजे २०२० साली करण जोहर चाहत्यांना खुश करणार हे नक्की.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

वसतिगृहांच्या तक्रारींवर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा आरपीआयचा इशारा

क र्जत,- तालुक्यातील विविध शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आरपीआयच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्त यांची भेट घेऊन तक्रार केली. वसतिगृहांच्या कार्यपद्धतीत आठ दिवसात सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे

अमृतसर – रावण दहनापूर्वीचा खळबळजनक व्हिडीओ व्हारल

अमृतसर – अमृतसरमध्ये घडलेल्या ट्रेन अपघातामध्ये ६१ लोकांचा जीव गेला. तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यातच एक खळबळ जनक वृत्त समोर येत...
Read More
post-image
महाराष्ट्र

फटाक्याच्या कारखान्याला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

उस्मानाबाद -उस्त्मानाबादमधील तेरखेडा येथील एका फटाक्याच्या कारखान्यात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. दरम्यान, घटनेवेळी कारखान्यात कोणीही नसल्याने मोठी जिवितहानी टळली. वाशी तालुक्यातील तेरखेडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीजवर ८ गडी राखून भारताचा दणदणीत विजय

गुवाहाटी- पाहुण्या वेस्ट इंडिजविरुद्ध आज येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी...
Read More
post-image
महाराष्ट्र

रेशनचे धान्य कमी मिळाल्याने बुलढाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

खामगाव – रेशनचे धान्य कमी मिळत असल्याने त्रस्त झालेल्या एका लाभार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना खामगाव तालुक्यातील पळशी बु....
Read More