मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना नुकताच मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र डिस्चार्ज दिल्यानंतर मुंबई महापालिकेने केलेल्या चाचणीत नवनीत राणा यांच्यासह रवी राणा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
खासदार नवनीत राणा यांच्यासह कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तातडीने नागपूरहून मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. डिस्चार्जनंतर मुंबई महापालिकेने पुन्हा नवनीत राणा आणि रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राणा दाम्पत्यांना 15 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.