खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, भरारी पथके नेमण्याचे आदेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, भरारी पथके नेमण्याचे आदेश

मुंबई – राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.  यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय २३ मे रोजी घेण्यात आला असून ३० जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहित करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत.

मात्र अद्यापही, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे  अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनीदेखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

भरारी पथकांचे कार्य

१)    वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा या भरारी पथकांमार्फत करण्यात येईल.

२)   खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी केली जाईल.

३)   खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी.

४)  आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी.

५)   महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे या सर्व बाबींची तपासणी करावी.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

गुजरात सरकारचा मोठा निर्णय; पाच शहरात ७० मजली इमारती

गांधीनगर – गुजरात सरकारने दुबई आणि हॉंगकाँग प्रमाणे गुजरातच्या पाच शहरांमध्ये गगनचुंबी इमारती उभारण्याचे ठरविले आहे. गुजरातच्या गांधीनगर, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश मुंबई

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे पेट्रोलच्या दरात वाढ होत असली तरी...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

खासदार ओमराजे निंबाळकर हल्ला प्रकरण! फरार झालेला आरोपी जेरबंद

उस्मानाबाद – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरवर यांच्यावर चाकू हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे हा अचानक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. त्यांनतर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने शहांना सोमवारी रात्री एम्स रुग्णालयात दाखल...
Read More
post-image
महाराष्ट्र

पावसामुळे महाड-भोर मार्गातील वरंध घाटात भिंत कोसळली

महाड – गेले चार-पाच दिवस संपूर्ण महाड तालुक्यात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे महाड-भोर मार्गावरील वरंध घाटात भिंत कोसळल्याची घटना घडली. यंदाच्या...
Read More