खाजगी कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक – eNavakal
गुन्हे मुंबई

खाजगी कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक

मुंबई – आग्रीपाडा परिसरातील एका खाजगी कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या वफादार हुसैन तस्सवर हुसैन सयद याला शुक्रवारी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अहमद जमाल अब्दुल अजीज कोटा यांचा आग्रीपाडा परिसरात जमाल एक्सपोर्ट मॅनपॉवर कंन्सल्टंट नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी विदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांचे व्हिसासह इमिग्रेशन क्लिअरिंगचे काम करते. त्यांच्याकडे आसिफ आणि कुतूबुद्दीन यांच्यासह इतर अठरा कर्मचारी कामाला आहे. यातील आसिफ हा विदेशात जाणार्‍या नागरिकांचे पासपोर्टवर व्हिजा लावण्याचे तर कुतूबुद्दीन व्हिसा स्टॅप झालेल्या नागरिकांचे इमिग्रेशनचे ऑनलाईन कागदपत्रे तयार करणे आणि नंतर सांताक्रुज येथील इमिग्रेशन कार्यालयात पाठविण्याचे काम करतो. दोन वर्षांपूर्वी विदेशात जाणार्‍या नागरिकांच्या पासपोर्टवर दुसर्‍या व्यक्तीचे व्हिसा स्टॅप केले जात असल्याची माहिती प्राप्त होताच तक्रारदाराने त्याची शहानिशा सुरु केली होती. यावेळी आसिफ व कुतूबुद्दीनने वफादार या मित्राच्या मदतीने 137 जणांना सौदीत नोकरीसाठी पाठवून त्यांच्याकडून सहा लाख रुपये उकाळले होते. अशा प्रकारे त्यांनी कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांत गुन्हा नोंद होताच 15 डिसेंबर 2017 रोजी आसिफ इसहाक शेख आणि कुतूबुद्दीन निजामुद्दीन खान या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत वफदार सयद याचे नाव समोर आले होते. त्याचा शोध सुरु असतानाच त्याला शुक्रवारी माझगाव येथील भंडारटेकरी परिसरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते व्हायब्रेंट गुजरातच्या विश्व संमेलनाच्या नवव्या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या संमेलनाचे आयोजन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुला पाहते रे’चं ‘रॅपचीक’ सॉंग ऐकलंत?

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ सध्या फारच चर्चेत आहे. ते म्हणजे ईशा-विक्रांत यांच्या लग्नामुळे. चाहत्यांनी या दोघांचे अनेक मिम्स,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More