#खवय्ये : लोअर परळचे ‘न्यु मयुर गार्डन’ फॅमेली रेस्टॉरंट – eNavakal
लेख

#खवय्ये : लोअर परळचे ‘न्यु मयुर गार्डन’ फॅमेली रेस्टॉरंट

लोअर परळच्या ना.म.जोशी मार्गावर दिपक सिनेमा शेजारी हॉटेल ‘न्यु मयुर गार्डन’ आहे. हा परिसर गजबजलेला असून येथे खूप कार्यालये आणि कॉर्पोरेट ऑफीस आहेत. आठवड्याचे सर्व दिवस दुपारी आणि रात्री या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी असते. आमचे जवळपास 80 टक्के ग्राहक हे नियमित ग्राहक आहेत. आम्ही देत असलेल्या पदार्थांना एक विशिष्ट चव असल्यामुळेच आमचे ग्राहक नियमित झाल्याचे हॉटेलचे व्यवस्थापन पाहणार्‍या रत्नाकर पुजारी यांनी ‘नवाकाळ’शी बोलताना सांगितले. मेंगलोरीयन पद्धतीने बनविलेला फीश मसाला. न्यु मयुर स्पेशल चिकन, चिकन पटीयाला, चिकन लटपटा आणि स्पेशल चिकन बिर्याणीही या हॉटेलची खासियत आहे.

न्यु मयुर गार्डन हॉटेलचे प्रोप्रायटर यजुवेंद्र सुरेंद्र सिंग हे असून गेल्या 3 वर्षांपासून बाबू पुजारी हे हॉटेल चालवीत आहेत. आठवड्याचे सर्व दिवस हॉटेल सकाळी 11 ते दुपारी 4 आणि सायंकाळी 7 ते रात्रौ 12.30 पर्यंत सुरू असते. एकावेळी 56 ग्राहक बसू शकतील अशी आसन व्यवस्था आहे. हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन खवय्यांची गर्दी जास्त असते. दुपारच्या वेळी जास्त संख्येने कार्यालयांतील खवय्ये तर रात्रीच्या वेळी फॅमेली कस्टमर अधिक संख्येने येत असतात. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारांमध्ये खूप सार्‍या पदार्थांची उपलब्धता आणि सर्वसामान्यांना परवडतील असे वाजवी दर यामुळे या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी टिकून आहे. ग्राहकांची विशेष पसंती मेंगलोरीयन फीश मसाला आणि क्रॅब मसाला या डिशेसना आहे. न्यु मयुर स्पेशल चिकन बिर्याणी, चिकन पटीयाला, चिकन लटपटा, बटर चिकन हांडी, चिकन तंदूरी सेजवान, चिकन टिक्का हांडी हे नॉन व्हेज तर पनीर कोफ्ता, पनीर लटपटा, मशरुम मसाला, भेंडी फ्राय या व्हेज डीश लज्जतदार आहेत. विविध प्रकारच्या व्हेज आणि नॉन व्हेज 28 प्रकारच्या थाळी न्यु मयुर गार्डनमध्ये मिळतात. व्हेज थाळी फक्‍त 60 रुपयांत मिळते तर अंडा मसाला थाळी 100 रुपयांमध्ये मिळते. चिकन थाळी 160 रुपयांत तर पापलेट मसाला थाळी फक्‍त 240 रुपयांत मिळते. मेंगलोरीयन पद्धतीसाठी लागणारे सर्व मसाले बाबू पुजारी स्वतः बनवितात. हॉटेलमध्ये लागणारे मासे दररोज ताजे मार्केटमधून आणले जातात. त्यामुळे ग्राहकांना चवीबरोबर ताजे मासे खायला मिळतात. मयुर स्पेशल चिकन बिर्याणी 350 रुपयांत मिळते. ही बिर्याणी शेफ स्पेशल डीश असून 3 माणसे खाऊ शकतील एवढी क्वांटीटी दिली जाते. इंडीयनसोबत चायनीज प्रकारातील सर्व प्रकारचे सूप, स्टार्टर्स, नूडल्स आणि राईस येथे उपलब्ध आहेत. चायनीज पदार्थांनादेखील ग्राहकांची मोठी मागणी आहे. जेवणामध्ये चपाती, तंदूर रोटी, पराठा, नानसोबत लुसलुशीत तांदळाची भाकरीदेखील मिळते. मालवणी, मेंगलोरीयन, पंजाबी आणि चायनीज प्रकारातील चमचमीत पदार्थ चाखण्यासाठी एकदा तरी न्यु मयुर गार्डन हॉटेलला अवश्य भेट द्या.

आठ माणसांसाठीचे मयुर स्पेशल चिकनचे फॅमेली पॅक

हॉटेलच्या मेनूकार्डवर स्पेशल डीशच्या यादीत मयुर स्पेशल चिकन या डिशचे नाव आहे. सहाशे रुपये किंमत असलेल्या या डीशला संपविण्यासाठी आठ खवय्ये लागतील एवढी क्वांटीटी दिली जाते. यामध्ये एक पूर्ण तंदुरी चिकनचे आठ पिस, चिकन ब्रेस्टच्या बोनलेस चिकनचा खिमा आणि स्पेशल मयुर मसाल्याचा वापर असतो. कांदा रिंग आणि बॉईल अंड्यांनी ही डीश छान सजविली जाते. फॅमेली आणि ऑफीस ग्रुपमध्ये मयुर स्पेशल चिकन फारच आवडीचे आहे. आमच्यासारखे स्पेशल चिकन बाहेर कुठेही मिळणार नाही, असा हॉटेलचे मालक रत्नाकर पुजारी दावा करतात.

टेक अवे पार्सलला मोठी मागणी

लोअर परळ भागातील बहुसंख्य ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणासाठी मयुर गार्डन हॉटेलमधून पार्सलची मोठी मागणी आहे. बहुसंख्य लोक फोन करून आपली ऑर्डर नोंदवतात आणि ठराविक वेळेत येऊन आपले पार्सल घेऊन जातात. एकावेळी 20 ते 25 लोकांच्या पार्सलची मागणी देखील येत असल्याचे हॉटेलचे मालक सांगतात. ऑर्डर नोंदविण्यासाठी 8898831611 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

बिहारमध्ये ‘एईएस’ आजाराने ११२ मुलांचा मृत्यू

पाटणा – बिहारमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजाराने कहर केला आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये या आजाराने आतापर्यंत तब्बल ९६ बालकांचा बळी गेला असून गेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी

मुंबई – ठाण्याच्या सुप्रसिद्ध विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये धक्कादायक संदेश मिळाला आहे. या बाथरूममध्ये संदेश ठेऊन मुंबईतील लोकप्रिय धार्मिक स्थळ सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More