#खवय्ये : मालाडचे गाव गजाली रेस्टॉरंट मासे खवय्यांसाठी पर्वणी – eNavakal
मुंबई लेख

#खवय्ये : मालाडचे गाव गजाली रेस्टॉरंट मासे खवय्यांसाठी पर्वणी

जगातील बहुसंख्य मोठ्या देशांमध्ये सिनियर शेफ म्हणून कामाचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या लॉरेन्स कार्डोझ यांनी 2018च्या अखेरीस मालाड पश्‍चिमेच्या सुंदर लेनमध्ये गावगजाली हे सीफूड आणि मल्टी क्विझीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. अभय नाईक हे या रेस्टॉरंटमध्ये त्यांचे पार्टनर आहेत. गावगजाली हे सी-फूड खाणार्‍या खवय्यांसाठी उत्तम ठिकाण आहे. कोणत्याही दिवशी या ठिकाणी फ्रोजन फीश वापरले जात नाही ही या रेस्टॉरंटची खासियत आहे.

मालाड पश्‍चिमेच्या ऑर्लेम चर्चच्या मागच्या बाजूस सुंदर लेनवर असणार्‍या या हॉटेलचे प्रवेशद्वार आणि नामफलक आकर्षकरित्या सजविलेला आहे. दररोज उपलब्ध असणार्‍या मेनूचा बोर्ड बाहेर लावलेला आहे. हॉटेल संपूर्णपणे वातानुकुलित आहे. आठवड्याचे सर्व दिवस मंगळवार वगळता सकाळी 8.30 ते रात्रौ 11.30 पर्यंत हॉटेल सुरू असते. एकावेळी 45 ग्राहक बसू शकतील अशी ऐसपैस आसनव्यवस्था आहे. सर्व प्रकारचे मासे एकाच ठिकाणी गावगजालीमध्ये मिळतात. सुरमई, हलवा, पापलेट, बांगडा, बोंबील, कोळंबी, मोरी, तिसर्‍या, खेकडे, मांदेली अशी लांबलचक सी-फूडची यादी मेनूकार्डवर उपलब्ध आहे. गावगजालीच्या कीचनमध्ये सर्व महिला स्वयंपाकी आहेत. कीचनचे पूर्ण व्यवस्थापन पण महिला प्रतिनिधी करते. गावगजाली मध्ये जेवणात लागणारे सर्व मसाले खास सावंतवाडी आणि रत्नागिरी येथे घरगुती पद्धतीने बनविले जातात. जेवणासाठी लागणारे सर्व नारळदेखील तळ कोकणातून मागविले जातात. जेवणात थाळीमध्ये चपाती, भाकरी किंवा वडे असे पर्याय आहेत. मुंबईतील हॉटेलमध्ये सहसा न मिळणारी आंबोळी येथे दररोज उपलब्ध आहे.

सकाळच्या वेळी चहा, व्हेज-नॉनव्हेज नाश्ता उपलब्ध आहे. खिमा पावला ग्राहकांची विशेष पसंती आहे. 12 मासांहारी तर 2 शाकाहारी थाऴींचा मोठा पर्याय ग्राहकांसमोर आहे. त्याव्यतिरिक्त पंजाबी, इंडियन, चायनीज अशा विविध रेसीपींमध्ये 90 च्या वर डिशेस हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. सर्व प्रकारच्या बिर्याणी आणि चायनीज राईस, सूप्स, डेझर्ट, शाकाहारी डिशेशदेखील उपलब्ध आहेत. थंडगार सोलकढी खास काचेच्या जारमध्ये दिली जाते. लवकरच गोरेगाव आणि बोरीवली येथे गावगजालीच्या शाखा सुरू होणार आहेत.

मालाड, परिसरातून मोठ्या प्रमाणावर लोक पार्सलद्वारे विविध पदार्थ गावगजालीतून मागवितात. 5 किलोमीटरच्या परिघात फ्री होम डिलीव्हरी दिली जाते. त्यासाठी 28884646, 7718888564 किंवा 8433602485 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्वीगी, झोमॅटो आणि फूड पांडा या अ‍ॅपवर देखील पार्सल सर्व्हीस उपलब्ध आहे.

फिश बिर्याणी लय भारी

मालक लॉरेन्स स्वतः खारदांडा, जुहू कोळीवाडा येथून ताजी मासळी दररोज खरेदी करतात. गावगजालीमध्ये मिळणारी फिश बिर्याणी एकदम लय भारीच आहे. ग्राहकाच्या आवडीनुसार बोंबील वगळता कोणताही मासा पॅनमध्ये ग्रील करून अखंड तुकडीची बिर्याणी फक्त 225/- रुपयात मिळते.

रेस्टॉरंट सेट-अप

हॉटेलचे मालक लॉरेन्स काड्रोज हे रेस्टॉरंट कन्सल्टंसी चालवितात. यामध्ये रेस्टॉरंट लायझनिंग, विविध परवाने, सेट-अप उभारणे यासारखी नविन रेस्टॉरंट सुरू करण्यासाठीची सर्व कामे करून दिली जातात. मालक लॉरेन्स यांनी आर्यलंडमध्ये नामचीन हन्ग्री डक या रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम केले त्या नावाने त्यांनी गोवा-म्हापसा आणि वांद्रे येथे रेस्टॉरंट सुरू केली आहेत.

संपर्क – प्रविण टेमकर 9137253990.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अशोक चव्हाणांवर जबरदस्ती नांदेडची उमेदवारी जाहीर

नांदेड – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अनेक कारणांनी पक्षाच्या निर्णयांवर नाराज असतानाच काल आठव्या यादीत त्यांना नांदेड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

पर्रीकरांचे पार्थिव ठेवलेल्या जागेचं शुद्धीकरण?

पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या कला अकादमीचे शुद्धीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

वाराणसीत मोदींविरोधात १११ तमिळ शेतकरी लढणार

तिरुचिरापल्ली – विविध मागण्यासाठी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनकर्त्या १११ शेतकऱ्यांनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : राज्यव्यवस्था निर्मितीची काळी बाजू

राष्ट्राची किंवा देशाची ओळख ही जशी तिथल्या समाजव्यवस्थेवर अवलंबून असते तितकीच या समाजव्यवस्थेचे नेतृत्व करणाऱ्या राज्य व्यवस्थेवरूनही त्या देशाची ओळख ठरते. अनेकवेळेला आपण जगातल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य, हार्बर मार्गावर आज ‘मेगाब्लॉक’; पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही

मुंबई – आज मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर कुठलाही...
Read More