#खवय्ये : प्रभादेवीचे ‘चला गोमंतक’ हॉटेल – eNavakal
महाराष्ट्र लेख

#खवय्ये : प्रभादेवीचे ‘चला गोमंतक’ हॉटेल

गोवा हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र आहे. येथील पर्यटनामध्ये गोवन खाद्यसंस्कृतीचा मोठा वाटा आहे. वांद्य्राचे हायवे गोमंतक हे गेल्या 28 वर्षांपासून उत्कृष्ट सी-फूड देणारे मुंबई उपनगरातील पहिल्या क्रमांकाचे हॉटेल आहे. हायवे गोमंतकची दुसरी शाखा प्रभादेवीच्या गोखले रोड दक्षिणेकडील कॅपिटल सहयोग सोसायटीमध्ये ‘चला गोमंतक’ या नावाने पाच महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. विशाल पोतनीस आणि हॉटेल मॅनेजमेंटची पदवी प्राप्‍त केलेला त्यांचा मुलगा पुष्कर पोतनीस प्रभादेवीच्या गोमंतकचे पूर्ण व्यवस्थापन सांभाळतात. गोव्याच्या संस्कृतीचे अनोखे दर्शन या हॉटेलच्या इंटीरियरमध्ये पाहायला मिळतेच आणि येथे मिळणारे टिपीकल सी-फूड अस्सल खवय्यांना पुन्हा पुन्हा या हॉटेलमध्ये जाण्यास भाग पाडते

रमेश पोतनीस आणि त्यांच्या पत्नी शशिकला यांनी गेली 28 वर्षे वांद्य्राच्या हायवे गोमंतकची लोकप्रियता टिकवली. या व्यवसायात मुलगा विशाल पोतनीस यांचेही मोठे योगदान आहे. पोतनीस कुटुंबियांची तिसरी पिढी पुष्कर यांच्या रूपाने हॉटेल व्यवसायात आली. व्यवसाय वृद्धी करण्याच्या हेतूने प्रभादेवीसारख्या परिसरात सुसज्ज जागेत हायवे गोमंतक दुसरी शाखा चला गोमंतक सुरू झाली. तळमजल्यावर विना वातानुकूलित कक्षामध्ये 30 जणांची तर पहिल्या मजल्यावर वातानुकूलित कक्षामध्ये 40 जणांची ऐसपैस आसनव्यवस्था आहे. आठवड्याचा गुरुवार वगळता हॉटेल दररोज सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7 ते 11.00 वाजेपर्यंत सुरू असते

चला गोमंतकमध्ये सर्व प्रकारचे पदार्थ हे गोवन पद्धतीने तयार केलेल्या मसाल्यांमध्ये केले जातात. विशेष म्हणजे हे सर्व मसाले पोतनीस यांच्या घरातच दळले जातात. विशाल पोतनीस यांच्या पत्नी विभा पोतनीस हॉटेलमध्ये लागणारे वाटण स्वत: तयार करतात. हॉटेलमध्ये मासे खवय्यांची संख्या अधिक आहे. कारण गोवन फिश करी ही हॉटेलची स्पेशालिटी आहे. हळदीचे पान टाकून केलेली पिवळ्या रंगातील पापलेट आणि सुरमई कढी आणि त्रिफळ घातलेली भगव्या रंगातील हलवा आणि बांगडा कढी चवीला लाजवाब आहे. अगदी आपण गोव्यातच खातोय का असा भास जणू निर्माण होतो.

नियमित माशांबरोबर येथे सौंदाळे, लेपा, मोदके, वेर्ल्या, शिणाणे, चोणक, रावस, कालव, तारले हे सिझनल फिश देखील वेगवेगळ्या रेसीपीमध्ये उपलब्ध आहेत. गाबोळी कोशिंबीर, माशांचे तिखले, जवळा आणि सुक्या बोंबलांचे किसमुर, प्रॉन्स करी, ग्रीन चिकन या सहसा सर्व नॉन व्हेज हॉटेलमध्ये न मिळणार्‍या रेसीपी येथे चाखायला मिळतात. या हॉटेलमधील चला गोमंतक थाळीला ग्राहकांची मोठी मागणी आहे. शाकाहारीमध्ये व्हेज थाळी आणि पुलाव मिळतो. हॉटेलमध्ये मिळणारे चिकन आणि मटणाचे सर्व प्रकार देखील गोवन पद्धतीच्या मसाल्यांमध्ये तयार केले जातात.

गेल्या 18 वर्षांपासून हायवे गोमंतकला ‘द बेस्ट कोस्टल फूड इन मुंबई सबर्ब’चा पुरस्कार मिळाला आहे. हायवे गोमंतकमधील मेनू कार्ड आणि अगदी तशीच चव आपल्याला चला गोमंतकमध्ये हमखास चाखायला मिळते. गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा खराखुरा आनंद मुंबईत लुटण्यासाठी प्रभादेवीच्या चला गोमंतकला एकदा तरी नक्‍की भेट द्या!

गोव्याच्या संस्कृतीचे अनोखे दर्शन

पोतनीस कुटुंबीय हे मूळचे गोव्याचे असल्याने हॉटेलचे इंटीरियर साकारताना पुष्कर पोतनीस यांनी कल्पकता दाखवत मंगेशी मंदिर, पणजीचे चर्च, गोव्यातील बीच, कोळी बांधव, स्तंभ यांची प्रोफेशनल आर्टिस्टने हाताने काढलेली चित्रे हॉटेलच्या भिंतींवर साकारली आहेत.

टेक अवे मेनू

चला गोमंतकमध्ये टेक अवे मेनू सर्व्हीस उपलब्ध आहे. तुमच्या आवडीचे जेवण फोन करून ऑर्डर नोंदवा आणि आपले पार्सल घेऊन जा. संपर्क- 8657488755, 8657488955.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More