#खवय्ये : ‘दि आईस्क्रीम बेकरी’ लाईव्ह आईस्क्रीमचा मॅजिक फंडा – eNavakal
मुंबई लेख

#खवय्ये : ‘दि आईस्क्रीम बेकरी’ लाईव्ह आईस्क्रीमचा मॅजिक फंडा

आपण एखाद्या आईस्क्रीम पार्लरमध्ये एखादा रेडीमेड कोन किंवा कप आईस्क्रीम घेऊन नेहमीच खात असतो. परंतु आपल्या आवडीचे कोणतेही आईस्क्रीम आपल्या डोळ्यादेखत समोर लाईव्ह तयार केले गेले तर? आईस्क्रीम मध्ये आपल्या आवडीच्या फ्लेवरचे ताजे फळ खरोखरच असले तर?काय कल्पना आवडली का अशा लाईव्ह आईस्क्रीमची? मुळचे सोलापूरचे असणारे प्रशांत वसंत कुंभार या तरुणाने मुंबईत सुरू केलेल्या ‘दि आईस्क्रीम बेकरी’ या कन्सेप्ट सेलींग आईस्क्रीम आऊटलेटमध्ये तुम्हाला हे लाईव्ह आईस्क्रीम टेस्ट करायचे थ्रील अनुभवता येईल.

फार्मास्युटीकलमध्ये एमबीए पदवी घेऊन सुमारे 8 वर्षे प्रशांत कुंभार यांनी मार्केटींग क्षेत्रात नोकरी केली. परंतु नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. नोकरी सांभाळत त्यांनी जवळपास 6 वर्षे फास्टफूड जॉईंट सुरू केले. सोडा पब, फ्रँकी आऊटलेट असे उद्योग करून त्यांना एकदा लाईव्ह आईस्क्रीम या संकल्पनेची माहिती मिळाली. या संकल्पनेेवर प्रशांत यांनी 3 महिने सखोल अभ्यास केला. इंटरनेटवरील माहिती, पुणे, मुंबई, दिल्ली येथे प्रत्यक्ष जाऊन अशाप्रकारे मिळणार्‍या आईस्क्रीमची चव चाखली. असे आईस्क्रीम बनविण्यासाठी लागणारे मशीन दिल्लीला जाऊन घरी आणले. घरातच जवळपास 3 महिने या आईस्क्रीमच्या विविध फ्लेवर्स, रेसीपी, घटक पदार्थ, बनविण्याची कृती यावर सतत प्रयोग करून परिपूर्ण प्रकल्प तयार झाल्याचे लक्षात आल्यानंतर ‘द आईस्क्रीम बेकरी’ चे पहिले आऊटलेट वाशी येथे 15 सप्टें. 2016 ला सुरू केले. इथेच ‘द आईस्क्रीम बेकरी’ च्या यशोगाथेस सुरुवात झाली. आजमीतीस प्रशांत यांनी मुंबई आणि नवी मुंबईत 5 आऊटलेट सुरू केली आहेत. ग्राहकांचा या सर्व आऊटलेटवर खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.

‘द आईस्क्रीम बेकरी’ च्या प्रत्येक आऊटलेटच्या इंटीरियरवर प्रशांत यांनी बारीक काम केल्याचे लक्षात येते. आऊटलेटचे फर्नीचर, काऊंटर, भिंती यांना नैसर्गिक लूक देण्याचा उत्तम पर्याय त्यांनी निवडला आहे. काऊंटरवर गेल्यानंतर सर्वात इंटरेस्टींग म्हणजे त्यांचे मेनूकार्ड. मेनूकार्डचे वर्गीकरण आणि सादरीकरण फार छान केल्याने खवय्यांना त्यांच्या आवडीच्या फ्लेवरचे खाणे निवडणे फार सोपे जाते. ‘द आईस्क्रीम बेकरी’मध्ये आईस्क्रीम शुटर्स, आईस्क्रीम शेक, मिल्क शेक्स आणि मॅशअ‍ॅप असे विविध मेनू उपलब्ध आहेत. आईस्क्रीमसाठी लागणारे सर्व रॉ-मटेरीअल भांडूप येथील कारखान्यात तयार करून पाचही आऊट लेटला पाठविण्यात येते. आईस्क्रीमच्या विविध फ्लेवर्ससाठी लागणारी फळे दररोज वाशीच्या मार्केटमधून ताजी खरेदी करण्यात येतात. कोणतेही फ्रोजन फ्रुट, इसेन्स, फ्लेवर्स द आईस्क्रीम बेकरीमध्ये वापरले जात नाही. हा त्यांचा युनिक सेलींग पॉईंट असल्याचे प्रशांत कुंभार अभिमानाने सांगतात.

मेनूकार्डमधील पहिल्या सेक्शनमध्ये सीझन रिझन या प्रकारात प्रत्येक मौसमातील सिझनल फळाचे आईस्क्रीम उपलब्ध आहे. सध्या स्ट्रॉबेरी आणि कलींगडाचा हंगाम सुरू असल्याने त्या आईस्क्रीमना अधिक मागणी आहे. पेरू, चीकू, पपई-अननस, किव्ही, केळी, नारळ, सिताफळ, अंजीर, खजूर अशा विविध फळांची आईस्क्रीम येथे मिळतात. प्रत्येक आईस्क्रीमच्या स्कूपसाठी त्या त्या फळांचे वजन निश्चित केले आहे. ग्राहकांच्या समोर या फळांना कापून आईस्क्रीम बेसमध्ये मिक्स करून त्यात साखर टाकून ब्लेंड केले जाते. त्यानंतर उणे वीस डीग्री सेल्सीअस तापमानाच्या आईस्क्रीम पॅन मशिनवर हे द्रावण टाकले जाऊन त्याचे आईस्क्रीम ग्राहकाच्या डोळ्यादेखत दोन मिनिटात तयार होते. 99 रुपयांपासून आईस्क्रीमच्या किंमती सुरू होतात. एक्स्ट्रा अफेअर मेनूमध्ये बॉन-बॉर्न, डार्क नाईट, ग्लॉसी चॉकलेट, बटर्ली पीनट यासह अनेक फ्लेवर्स उपलब्ध आहेत. चॉकलेटची पावडर न वापरता खर्‍या खुर्‍या चॉकलेटला मेल्ट करून त्याचा वापर या आईस्क्रीममध्ये केला जातो हे विशेष. टीआयबी मॅशअप या मेनूमध्ये न्यूयॉर्कर्स, बटर क्रंच आणि गिमी रेड हे तीन प्रकार उपलब्ध आहेत. टीआयबी ने फ्रेश फ्रुटचा वापर, डिझायनींगवर अधिक काम केले. टीआयबीसारखे आईस्क्रीम केक कुठेही मिळणार नाहीत, असा प्रशांत कुंभार यांचा दावा आहे. आईस्क्रीम केकमध्ये नाविन्यपूर्ण बदल करून आईस्क्रीम केकचा छोटा पॅक म्हणजे आईस्क्रीम शूटर देखील विविध आकर्षक फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे.

आईस्क्रीमच्या अभूतपूर्व यशानंतर टीआयबी ग्राहकांच्या सेवेत विविध मिल्क शेक्स आणले आहेत. यामध्येदेखील ताज्या फळांचे सर्वप्रथम आईस्क्रीम तयार करून मग ते दुधामध्ये ब्लेंड केले जाते. या मिल्क शेक्समध्ये कोणतेही जादा फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटीव्ह न टाकता नैसर्गिक चव राखण्यात त्यांना यश मिळाले आहे. टीआयबीच्या सर्व आऊटलेटमध्ये एकच मेन्यू कार्ड, त्यावरील एकसारखे दर आणि एकसारखी चव ग्राहकांना मिळते. एकदा चव घेऊन गेलेला ग्राहक पुन्हा परत हमखास येतो आणि येतांना सोबत नविन ग्राहक घेऊन येतो ही समाधानाची बाब आहे. येथे काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे.

आईस्क्रीमची चव, त्यामध्ये असणारा नैसर्गिकपणा वापरण्यात येणारे ताजे घटकपदार्थ ही त्यांची जमेची बाजू आहे. संपूर्ण भारतात टीआयबीची 100 आऊटलेट सुरू करण्याचे प्रशांत कुंभार या मराठमोळ्या युवकाचे स्वप्न आहे. सध्या स्वीगी आणि झोमॅटोवर पार्सल सेवा उपलब्ध आहे. द आईस्क्रीम बेकरीच्या व्यवसायात सहभागीदार होऊ इच्छीणार्‍या उद्योजकांनी प्रशांत यांना 8080515165 या क्रमांकावर संपर्क साधावा.

कलकत्ता मीठा आईस्क्रीम

टीआयबीमध्ये इतर ब्रँडप्रमाणे पानाच्या फ्लेअर्सचे आईस्क्रीम मिळते. परंतु येथे नियमित ठरविलेल्या पानवाल्याकडून कलकत्ता मीठा पान आणले जाते. ते फार बारीक कापून त्याला आईस्क्रीम बेसमध्ये ब्लेंड करून त्याचे स्पेशल आईस्क्रीम बनविले जाते.

ट्राय युअर लक?

टीआयबीच्या सर्व आऊटलेटमध्ये ‘रोल द डायस’ हा फनी गेम आहे. यामध्ये सापशिडी खेळातील 2 फासे टाकून जर दोन्ही फाशांवर 6 आकडा आला तर त्या ग्राहकाने दिलेली ऑर्डर पूर्णपणे मोफत दिली जाते. 6 व्यतिरिक्त इतर कोणताही आकडा दोन्ही फाशांंवर समान आला तर एक आईस्क्रीम मोफत दिले जाते. सो ट्राय युअर लक!

दी आईस्क्रीम बेकरी आऊटलेट्स

* शॉप-13, माणेक कॉम्प्लेक्स, वाशी सेक्टर 29
* शॉप-2, ग्वाल्हेर हाऊससमोर, आरामनगर, वर्सोवा
* शॉप-8, अन्नपूर्णा इंडस्ट्रीयल इस्टेट, पंतनगर, घाटकोपर (पूर्व)
* जी-9, रिप्लेज मॉल, सेक्टर-7, ऐरोली
* शॉप नं.-7, कालीदास नाट्यगृहासमोर, मुलुंड (प.)

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News क्रीडा मुंबई

आज माजी विजेत्या मुंबईची सलामी दिल्लीशी

मुंबई – यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत माजी विजेत्या रोहित शर्माच्या मुंबई संघाची सलामीची लढत दिल्ली संघाशी होणार आहे. तीन वेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई...
Read More
post-image
News क्रीडा विदेश

शाह स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा आशियाई विजेत्या जपानवर विजय

इपो, मलेशिया – माजी विजेत्या भारतीय हॉकी संघाने येथे सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत विजयी सलामी दिली. आपल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात भारतीय...
Read More
post-image
News देश निवडणूक

राहुल गांधींची संपत्ती 55 लाखांवरून 9 कोटी कशी? भाजपचा गंभीर आरोप

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच थेट निशाणा साधत त्यांची संपत्ती 55...
Read More
post-image
News देश निवडणूक

भाजपाची आणखी एक यादी जाहीर

मुंबई – भाजपाने 48 लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, झारखंड आणि गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे...
Read More
post-image
News देश निवडणूक

राज बब्बर यांची जागा बदलली! मुरादाबाऐवजी फतेहपूर सिकरी

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी काल रात्री काँगे्रसने आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेशातील काँगे्रसचे अध्यक्ष राज बब्बर यांना फतेहपूर...
Read More