#खवय्ये : चवीने खाणार त्याला ‘रसोई ट्रीट’ देणार! – eNavakal
मुंबई लेख

#खवय्ये : चवीने खाणार त्याला ‘रसोई ट्रीट’ देणार!

गोरेगाव पूर्वेच्या जयकोच परिसरातील लक्ष्मणनगरमधील लोटस कॉर्पोरेट पार्कच्या बाजूला ‘रसोई ट्रीट’ नावाचे हॉटेल आहे. या परिसरातील वाढत्या लोकसंख्येनुसार येथे हॉटेलची कमतरता होती, हे ओळखून गोरेगावचे स्थानिक रहिवासी असणार्‍या अनिल दळवी आणि त्यांचे बंधू आनंद दळवी यांनी 2 मे 2017 ला रसोई ट्रीट हे हॉटेल सुरू केले. चायनीज स्पेशालिटीचे सर्व खास पदार्थ, इंडियन फूड, थाय पद्धतीचे खास पदार्थ, सोबत स्नॅक्स, पावभाजी, बिर्याणी असा भरगच्च मेनू येथे उपलब्ध आहे. दर्जेदार कच्चा माल, चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो न वापरणे आणि पंचतारांकीत हॉटेलमध्ये चायनीज बनविण्याचा अनुभव असणारा मेन शेफ यामुळे या हॉटेलच्या पदार्थांमध्ये खास चव चाखायला मिळते. म्हणूनच आठवड्याचे सर्व दिवस येथे खवय्यांची वर्दळ असते.

मराठी माणूस सहसा हॉटेल व्यवसायात नव्याने येत नाही. आपण हॉटेल सुरू करायचा धाडसी निर्णय घेतला. कालच माझ्या हॉटेलचा दुसरा वर्धापनदिन संपन्न झाला. ग्राहकांच्या मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल मी समाधानी आहे. म्हणूनच संपूर्ण मे महिना आमच्या रसोई ट्रीटमध्ये येणार्‍या प्रत्येक खवय्याला बिलामध्ये फ्लॅट 15 टक्के सवलत दिली जाणार आहे असे मालक अनिल दळवी यांनी ‘नवाकाळ’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. हॉटेलच्या शेजारी ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे लवकरच प्रशस्त जागेत अजून एक रसोई हॉटेल सुरू करणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.
हॉटेलच्या तळ मजल्यावर किचन आणि पार्सल काऊंटर असून पहिल्या मजल्यावर एकावेळी 36 ग्राहक बसू शकतील अशी आसनव्यवस्था आहे. हॉटेल वातानुकूलीत असून प्रत्येक टेबलावर पिण्यासाठी आकर्षक काचेच्या बाटल्या ठेवल्या आहेत. सकाळी आठ वाजता हॉटेल सुरू होते. साऊथ इंडियन नाश्ता, मिसळ पाव, पुरी भाजीसोबत खवय्यांच्या फार आवडीचा समोसा मिळतो. दुपारी 12 पासून रात्रौ 12 पर्यंत जेवण मिळते. हॉटेल आठवड्याचे सर्व दिवस खुले असते. हॉटेलमध्ये मिळणार्‍या कोणत्याही चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो वापरले जात नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंग वापरले जात नाही. चिकन रेड थाई करी, चिकन थाय लॉलीपॉप चिकन तंदूर बिर्याणी, चिकन सिंगापूर बिर्याणी चिकन विंग ब्लॅक पेपर, बटर गार्लिक चिकन, चिकन मिनी मिल अशी नॉनव्हेज स्पेशालिटी तर व्हेजमध्ये कुंग फू पोटॅटो, पोटॅटो च्यांव च्यांव आणि भरवाँ आलू तंदुरी असे काही नाविन्यपूर्ण पदार्थांचे पर्याय आहेत

चायनीज सूपमध्ये रेग्युलर सूपसोबत चिकन टॉम यम सूप, ड्रॅगन सूप आणि वॉनटॉन सूप हे ग्राहकांच्या खास पसंतीचे आहेत. तंदुरी स्टार्टर्समध्ये नियमित सर्व प्रकारच्या तंदुरीसोबत चमचमीत तिखट खाणार्‍यांसाठी चिकन शोले कबाब आणि चिकन तुफानी कबाब हे पर्याय मेनूकार्डवर उपलब्ध आहे. दाल खिचडी ऑम्लेट आणि चिकन दाल खिचडी हे अनोखे आणि काहीसे वेगळे कॉम्बीनेशन येथे उपलब्ध आहे. चायनीज, थाय पदार्थांची अनोखी आणि ओरिजनल चव चाखायची असेल तर रसोई ट्रीटला एकदा तरी अवश्य भेट द्या. फूड अ‍ॅपवर पाचपैकी साडेचार स्टारचे या हॉटेलला रेटींग मिळाले आहे.

पार्टी ऑर्डर आणि पार्टी सेटअप

रसोई ट्रीट पार्टीसाठी लागणार्‍या जेवणांच्या ऑर्डर स्वीकारतात. तसेच जर पार्टी सेटअपची आवश्यकता असल्यास बुफे लावणे, सर्व्हीस स्टाफ उपलब्ध करून देतात. गोरेगावच्या एक किलोमीटर परिसरात फ्री होम डिलीव्हरी पण देतात. संपर्क 9320110100 किंवा 022- 26850388/89.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आजपासून पुणे परिवहनच्या बसेसचा सीएनजी पुरवठा बंद

पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)चा पुरवठा आज 24 मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या असांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More