खराब रस्त्यांमुळे अपघात झाले तर काय करू – eNavakal
News महाराष्ट्र

खराब रस्त्यांमुळे अपघात झाले तर काय करू

बदलापूर,  खराब रस्त्यामुळे अपघात होत असतील तर मी काय करू, असे भाजपा नगरसेविकेला उत्तर देणार्‍या बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांच्या विधानाने सभागृहात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात हमरीतुमरी झाली. नगराध्यक्षा राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. रस्त्यावर पडलेल्या खड्यांबाबत वारंवार तक्रार करूनही रस्ते होत नाहीत. झाले तर नागरिक जखमी होतात. याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपच्या नगरसेविका धुळे यांनी मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांना विचारला. यावरून प्रत्येक कामाला प्रोसिजर असते. मी पाठपुरावा करतो. मलाही कामाच्या मर्यादा आहेत. अपघात होऊन नागरिक जखमी होत असतील तर मी काय करू? असे उत्तर मुख्याधिकारी बोरसे यांनी दिले. याचवेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक आशिष दामले यांनी चर्चेत भाग घेतला आणि मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरले.
त्यावेळी मुख्याधिकार्‍यांचा पारा आणखीच चढला आणि त्यांनी नगरसेवकाचे शहाणपण काढण्यास सुरूवात केल्याने सभागृहाचे वातावरण तापले. अखेरीस वामन म्हात्रे आणि राजन घोरपडे यांनी मध्यस्थी केल्याने मुख्याधिकारी बोरसे आणि नगरसेवक दामले यांच्यातील वाद मिटला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More