मुंबई – कोरिओग्राफर पुनित पाठक ‘खतरों के खिलाडी’ सिझन ९चा विजेता ठरला आहे. पुनितने फायनलमध्ये आदित्य नारायण आणि रीधिमा पंडितवर मात करत जेतेपद पटकावले आहे. पुनितला या शोमध्ये २० लाख रुपये आणि नवीन कार मिळाली आहे. या शोमध्ये पुनीतने एकही स्टंट अर्धवट सोडला नसून कोणताही स्टंट अबॉटही केलेला नाही. तसेच त्याला फक्त एकदाच फिअर फंदा मिळालेला. पुनित पाठक कोरिओग्राफर असून त्याने डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शो पासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. सध्या तो डान्स प्लस या कार्यक्रमात मेन्टॉरची भूमिका बजावत आहे.
