खड्यात फसवणूक, सराफाला दणका – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

खड्यात फसवणूक, सराफाला दणका

नाशिक  – तीन कॅरेटचा एमराल्ड या किमती खड्याच्या (स्टोन)व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने भंडारी ज्वेलर्स गॅलक्सी प्रा. लि. ला स्टोन बदलून देण्याचे निर्देश दिले आहे. ते बदलता येत नसले तर ४० हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चपोटी तीन हजार रुपये अदा करण्याचे आदेशात म्हटले आहे.

शिर्डीतील  कुणाल सर्जेराव शेळके यांनी केलेल्या तक्रारीवरुन न्यायमंचाने हा निकाल दिला आहे. शेळके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले की, तीन कॅरेट वजनाचा एमेराल्ड स्टोन ४० हजार रुपये किंमतीस खरेदी केला. स्टोन व सोन्याची अंगठी यापोटी ५४ हजार १३१ रुपये भंडारी ज्वेलर्सला दिले. अंगठी वापरण्यास सुरुवात केल्यानंतर दोन तीन दिवसात स्टोनच्या मध्यभागी आतील बाजूस तडा केल्याचे लक्षात आले. त्यासाठी ज्वेलर्समध्ये संपर्क साधला असता बदलून देण्याचे सांगण्यात आले. पण, नंतर स्टोन बदलून दिला नाही व रक्कमही दिली नाही. स्टोन तकलादू व कच्चा खडा देवून फसवणूक केल्यामुळे मला स्टोन द्यावे किंवा रक्कम परत मिळावी असे त्यांनी तक्रारीत सांगितले.

तक्रारीवर भंडारी ज्वेलर्स गॅलक्सीकडून आपली बाजू मांडण्यासाठी कोणीही हजर झाले नसल्याने न्यायमंचाने  एकतर्फी निकाल दिला. स्टोन बदलून देणे शक्य नसल्यास तक्रारदाराला ४० हजार रुपये व्याजासह द्यावे. त्याचप्रमाणे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चपोटी तीन हजार रुपये अदा करावे असा निकाल दिला आहे .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More