खड्ड्यांची सवय झाली आहे! मुंबईकर पालिकेचा निष्काळजीपणा सहन करतील – eNavakal
News मुंबई

खड्ड्यांची सवय झाली आहे! मुंबईकर पालिकेचा निष्काळजीपणा सहन करतील

मुंबईं,- शहरातील रस्ते, फूटपाथ वरल खड्ड्यांच्या बाबतीत मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात सहनशिलता आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ते मान्सूनमध्ये मुंबई महानगरपालिकेची निष्काळजीपणा निमुटपणे सहन करतील अशा शब्दात उच्च न्यायालयाने महापालिकेला खडेबोल सुनावणले. मुंबई शहरातील रस्ते, फूटपाथ खड्डे बुजविण्यास मेटा कुटीला आलेल्या मुंबई महापालिकेने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याबरोबर त्या खड्ड्यांचा समाना करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात शहरातील रस्ते, फूटपाथ खड्डे मुक्त केले जातील, अशी ग्वाही देणार पालिकेच्या प्रतिज्ञापत्रावर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्याखंडपीठाने नाराजी व्यक्त केली. खड्ड्यांच्या संदर्भात न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी पाठविलेल्या पत्राची दखल घेऊन न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतली आहे. त्या याचिकेवर मुुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पालीकेच्या प्रतिज्ञापत्रज्ञवर नाराजी व्यक्त केली या बाबत वारंवार आदेश देऊनही पालीका प्रशासनाने मॉन्सून दरम्यानच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर कामे केली नाहीत याची स्पष्ट कबुलीच आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अशोक चव्हाणांवर जबरदस्ती नांदेडची उमेदवारी जाहीर

नांदेड – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अनेक कारणांनी पक्षाच्या निर्णयांवर नाराज असतानाच काल आठव्या यादीत त्यांना नांदेड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

पर्रीकरांचे पार्थिव ठेवलेल्या जागेचं शुद्धीकरण?

पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या कला अकादमीचे शुद्धीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

वाराणसीत मोदींविरोधात १११ तमिळ शेतकरी लढणार

तिरुचिरापल्ली – विविध मागण्यासाठी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनकर्त्या १११ शेतकऱ्यांनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : राज्यव्यवस्था निर्मितीची काळी बाजू

राष्ट्राची किंवा देशाची ओळख ही जशी तिथल्या समाजव्यवस्थेवर अवलंबून असते तितकीच या समाजव्यवस्थेचे नेतृत्व करणाऱ्या राज्य व्यवस्थेवरूनही त्या देशाची ओळख ठरते. अनेकवेळेला आपण जगातल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य, हार्बर मार्गावर आज ‘मेगाब्लॉक’; पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही

मुंबई – आज मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर कुठलाही...
Read More