खड्डे मुक्तीसाठी मनसेचे आयुक्त दालनासमोर आंदोलन – eNavakal
News आंदोलन महाराष्ट्र

खड्डे मुक्तीसाठी मनसेचे आयुक्त दालनासमोर आंदोलन

पिंपरी –  पावसाला सुरुवात होताच पिंपरी- चिंचवड शहरातील रस्त्यावर सर्वत्र खड्डे- खड्डेच पडले आहेत. अनेक विभागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहर खड्डे मुक्त करण्यासाठी मनसेने आज महापालिका आयुक्त दालनसमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. स्थापत्य विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते दुरुस्त होणे अपेक्षित होते. परंतु आपल्याकडून कोणत्याही प्रकरणाचे काम न झाल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्याचा परिणाम म्हणजे शहरात अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत.

शहरात पाऊसामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. नागरिकांनी कर ही भरायचा आणी कर भरून ही स्वताचा जिव ही द्यायचा ही कोणती पध्दत आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील खड्डे बुजविण्यात यावेत. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवून आंदोलन करण्यात येईल. यावेळी असा इशारा देण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणार्‍या व्यक्तीला चाकूने भोसकले

मुंबई- विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणे एका 39 वर्षांच्या व्यक्तीला चांगलेच महागात पडले. मध्यस्थी करणार्‍या या व्यक्तीला तरुणानेच चाकूने भोसकले. त्यात फिरोज नियास खान हा...
Read More
post-image
News मुंबई

ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा महसूल बुडविणार्‍या 11 जणांना अटक! कॅशसहित इतर मुद्देमाल जप्त

मुंबई- ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणार्‍या अकरा जणांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सात ठिकाणी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई करून एक लाख...
Read More
post-image
News देश निवडणूक

मध्य प्रदेशचे कमलनाथ नवे मुख्यमंत्री

भोपाळ – विधानसभा निवडणुकांत यश मिळवल्यानंतर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आज दिवसभर जोर बैठका...
Read More
post-image
News देश

योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगावी-अखिलेश यादव

लखनऊ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण...
Read More
post-image
News मुंबई

ईदला ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन! लाऊडस्पीकरचा आवाज वाढला

मुंबई -ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी न्यायालयाने आदेश देवूनही राज्यात ध्वनिप्रदूषण होत असताना तक्रार देऊनही राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने उच्च न्यायालयाने आज तीव्र...
Read More