खचलेल्या मुंब्राबायपासची पीडब्ल्यूडी विभागाकडून पाहणी – eNavakal
News महाराष्ट्र वाहतूक

खचलेल्या मुंब्राबायपासची पीडब्ल्यूडी विभागाकडून पाहणी

ठाणे – मुंब्रा बायपास दुरवस्थेमुळे दुरुस्तीसाठी दोन महिने वाहतूक बंद करण्यात आली असतानाच सतत तीन दिवस मुसळधार सातत्याच्या पावसाने बायपासची जमीन खचल्याची घटना घडली. सदर प्रकार हा जमिनीत पाणी मुरल्याने घडला असून बायपास दुरुस्तीसाठी एक महिना लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता कांबळे यांनी दिली. मुंब्रा बायपास जवळ असलेल्या डोंगरावरील पाऊसाचे पाणी पूर्वी नैसर्गिक असलेल्या नाल्यातून वाहून जात होते. मात्र तो नाला बंद करण्यात आल्याने या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येत होती. मात्र राष्ट्रवादी आमदार आणि नगरसेविका यांनी यामुळे बायपास खालील काही विभागात पूरस्थिती निर्माण होत असल्याचे सांगत काम बंद केले होते. त्यामुळे पावसाळ्यात बायपास लगतच्या डोंगरावरून वाहणारे पाणी हे रोडच्या बाजूला असलेल्या मातीत मुरल्याने बायपास रोडच्या डांबरीकरणाच्या बाजूचा भाग खचला आहे.

शनिवारी याची दुरुस्ती करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञ टीम येणार असून पाहणी केल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी निचरा होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी टाकण्यात येणारी पाईपलाईनचे काम सुरू करण्यापूर्वी बायपास लागत असलेल्या काही झोपड्यांचा सर्व्हे करून त्यांचे पुनर्वसन केल्यानंतरच पुढील पाइपलाईनच्या कमला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता कांबळे यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More
post-image
क्रीडा

रोहित शर्माचे सर्वाधिक षटकार

नवी दिल्ली – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चांगली फलंदाजी करणार्‍या कर्णधार रोहित शर्माने षटकारांच्या बाबतीत आणखी एक विक्रम केला. गेल्या 10 वर्षात रोहितने सातत्याने...
Read More
post-image
क्रीडा विदेश

फेडरर-जोकोव्हिच जोडी पराभूत

शिकागो – लेवर चषक सांघिक टेनिस स्पर्धेत युरोप विरुद्ध अमेरिका यांच्यातील लढतीत पहिल्या दिवशी युरोप संघाने 3-1 अशी मोठी आघाडी घेतली आहे. टेनिसमधील दिग्गज...
Read More