खंबाटकी घाटालगत ट्रक-बोलेरोच्या अपघातात तीन ठार! दोन गंभीर – eNavakal
News महाराष्ट्र

खंबाटकी घाटालगत ट्रक-बोलेरोच्या अपघातात तीन ठार! दोन गंभीर

सातारा – सातार्‍याच्या खंबाटकी घाटालगत असलेल्या हॉटेल पार्क इन सहारा समोर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकला सातारा बाजूकडून येणार्‍या बोलेरो जीपने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीनजण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
आज सकाळी कोकणातून बोरीवलीकडे निघालेली बोलेरो जीपने हायवे लगत उभा असलेल्या मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, जागेवरच बोलेरोतील तिघांचा मृत्यू झाला. विलास शंकर सामंत (62), बाळकृष्ण शंकर सामंत (67), विनय गंगाधर सामंत (54) अशी मृतांची नावे असून हे बोरिवलीतील रहिवासी आहेत. स्मिता विनय कामत (72) व बोलेरो जीप चालक रवी गावंकर (35) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिरवळ येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More