खंडणी स्वीकारताना महिला ब्लॅकमेलरला रंगेहाथ अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

खंडणी स्वीकारताना महिला ब्लॅकमेलरला रंगेहाथ अटक

कल्याण – कल्याणातील एका सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायीकाला ब्लॅकमेल करून तब्बल 20 लाखांची खंडणी स्वीकारताना कल्याण पश्चीमेकडील एका हॉटेलमधून ठाणे खंडणी पथकाने सापळा रचून त्या ब्लॅकमेलर महिलेला रंगेहात अटक केली आहे. सुषमा दाते (45) असे खंडणीखोर महिलेचे नाव आहे. कल्याणातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक मिलिंद कुलकर्णी यांचे कल्याण पश्चीम परिसरात कार्यलय आहे. या कार्यलयात 13 वर्षापासून ब्लॅकमेलर सुषमा ही नोकरी करयाची. मात्र गेली तीन वर्षापासून ती या ठिकाणी काम करीत नव्हती. दरम्यान ऑगस्ट 2017 पासून ब्लॅकमेलर सुषमा हिने मोबाईलवर धमकी देत, तुमची माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. ही क्लिप तुमच्या कुटुंबाला दाखवून तुमची समाजात बदनामी करेल. अशी वारंवार कुलकर्णी यांना धमकी देत होती. मात्र उगाच बदनामी नको म्हणून या ब्लॅकमेलर महिलेला दरम्यानच्या काळात 11 लाख रुपये दिले. तरी देखील ती कुलकर्णी यांना बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, 40 लाखांची मागणी करत माझ्या जीवाचे बरेवाईट करून तुमचे नाव घेईल. तसेच माझी बहीण पोलीस असल्याचीही धमकी देत होती. अखेर ब्लॅकमेलर सुषमा हिच्या त्रासाला कंटाळून कुलकर्णी यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेत, तिची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार 40 लाखांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले होते. हाच हप्ता घेण्यासाठी आज सायंकाळी 4 वाजल्याच्या सुमाराला ठाणे खंडणी पथकाचे सहाय्यक निरीक्षक विलास खेडकर, पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सापळा रचला होता. कल्याण-मुरबाड रोडवरील एका हॉटेलमधून कुलकर्णी यांच्याकडून 20 लाख रुपये स्वीकारताना ब्लॅकमेलर सुषमाला रंगेहात अटक केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More