क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना!  – eNavakal
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि गर्दी टाळून आपण कोरोनापासून लांब राहू शकतो. अशातच क्वारंटाईन असताना लोकांनी काय खावं आणि काय टाळावं याची सूचना स्वतः जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. या सूचना प्रत्येकासाठी महत्त्वाच्या असून त्या नेमक्या काय आहेत याची माहिती आपण घेऊ.

काय खावं ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, क्वारंटाईनमध्ये आपला दररोजचा आहार हा पौष्टिक असावा. फायबरयुक्त जसं कि, भाज्या, फळं, डाळी, ओट्स, ब्राऊन पास्ता, ब्राऊन राईस आदी फायदेशीर असे सहज पचणारे पदार्थ खावेत. जेवणानंतर गूळ किंवा बडीशेप घ्या त्याने अन्नपचनास मदत होईल.

अन्नासोबतच पाण्याचीही महत्त्वाची भूमिका आहे. जास्तीत जास्त पाणी प्यावं. शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी दिवसातून कमीतकमी ८ ते ९ ग्लास पाणी प्यावं. केवळ कोरोनासाठीच नव्हे तर नेहेमीच्या जीवनशैलीत देखील जास्तीत जास्त पाणी प्यावं. लिंबू सरबत, ज्यूस किंवा दूधही तुम्ही पिऊ शकता. तसंच जेवताना सलाडही खावं.

आहारात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी या फळांचा समावेश करावा त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

‘हे’ खाणं टाळावं 

काय खावं यासोबतच काय खाणं टाळावं याची माहिती असणंही गरजेचं आहे. पॅकेट आणि डब्बाबंद असलेले पदार्थ खाणं टाळावं. या व्यतिरिक्त घरातील ताजं बनवलेल्या अन्नाला प्राध्यान द्यावं. तसंच मिठाचं व साखरेचं प्रमाण कमी असलेले पदार्थ खावेत.

चहा, कॉफीचं सेवनही नियंत्रणातच असावं. अन्यथा त्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. चहा, कॉफीची जास्त तलफ आली असेल तरी देखील स्वतःवर ताबा ठेवा.

रिफाईंड धान्य जसं मैदा, पांढरा पास्ता, पांढरा ब्रेड आदींचं सेवन टाळावं. तसंच पांढरा तांदूळ देखील नियंत्रणातच खावा.

लाल आणि चरबीयुक्त मांस, लोणी, फुल फॅट दूधही टाळण्याचा सल्ला संघटनेने दिला आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More