‘क्रिएटीव्ह करिअर काऊन्सलिंग-१८चे आदित्य ठाकरे करणार उदघाटन – eNavakal
Uncategoriz

‘क्रिएटीव्ह करिअर काऊन्सलिंग-१८चे आदित्य ठाकरे करणार उदघाटन

कलेच्या वाटेवर चालू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंथनचे मोफत ‘क्रिएटीव्ह करिअर काऊन्सलिंग-१८’
कलाक्षेत्रातील ‘बाप’ माणसे देणार विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
मुंबई-  दहावी, बारावीचे निकाल लागतील. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पारंपारिक पद्धतीचे शिक्षण घेत नोकऱ्यांच्या शोधार्थ भटकतील. तर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना हेटाळणीला सामोरे जावे लागेल. कुटुंबाची बोलणी खावी लागतील. परत अभ्यास करुन पुढच्या वेळेस पास होण्याचा ते निर्धार व्यक्त करतील. खरंतर या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांची मने पालक समजून घेत नाहीत आणि त्यांच्यावर स्वत:च्या अपेक्षांचे ओझे लादले जाते. अशा विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मंथन आर्ट स्कूल आणि युवासेना हे संयुक्त विद्यमाने ‘क्रिएटीव्ह करिअर काऊंन्सलिंग-१८’ नावाचे मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करत आहे. शनिवार, २६ मे रोजी सकाळी १०.३० वाजता पु.ल.देशपांडे सभागृह, प्रभादेवी येथे हे शिबीर होणार आहे. या करिअर मार्गदर्शन शिबीराचे उदघाटन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, अ‍ॅडगुरु भरत दाभोळकर यांच्य़ा उपस्थितीत करणार आहेत.
चार दिवस चालणाऱ्या या करिअर मार्गदर्शन शिबीरात कलाक्षेत्रातील ‘बाप’माणसे मार्गदर्शन करणार आहेत. २७ मे रोजी ‘ऍप्लाईड आर्टची काय गरज’ या विषयावर प्रसिद्ध कलाशिक्षक प्रा. शशिकांत गवळी आणि ‘फाईन आर्ट’ विषयी प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत मार्गदर्शन करणार आहे. २८ मेला ‘कॅलिग्राफी’ या विषयावर कल्पेश गोसावी आणि ‘व्यावसायिक छायाचित्रणा’विषयी दिलीप यंदे मार्गदर्शन करतील. शेवटच्या दिवशी, २९ मे रोजी तुषार मोरे युआय/युएक्स डिझाईन विषयी आणि सुप्रसिद्ध सिने गीतकार महेश कांगणे चित्रपट गीते आणि पटकथा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.      हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून पारंपारिक शिक्षणव्यवस्थेपेक्षा कलेतून जीवन जगू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन मंथन आर्ट स्कूलचे संचालक प्रा. शशिकांत गवळी आणि युवासेना केंद्रीय समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केले आहे. जागा मर्यादीत असल्याने पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी  ९१६७० १३९५९ या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर

इगतपुरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर करण्यात आले आहे. २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची १ रुपयाही कर्जमाफी केली नाही, असे म्हणत ‘मोदी सरकार जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही नरेंद्र...
Read More