कौटुंबिक वादातून चुलतीची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या – eNavakal
News मुंबई

कौटुंबिक वादातून चुलतीची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या

मुंबई – कौटुंबिक वादातून आपल्याच 40 वर्षांच्या चुलतीची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या पुतण्याला मंगळवारी रात्री उशिरा वांद्रे येथून वाकोला पोलिसांनी अटक केली. समीर ऊर्फ लहू अंकुश नाईक असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर त्याची चुलती संगीता प्रदीप नाईक हिची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर समीरला आज दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास सांताक्रुज येथील वाकोला, डावरीनगरात घडली होती.
याच परिसरात संगीता ही तिचा पुतण्या समीरसोबत राहत होती. या दोघांमध्ये राहत्या घराच्या हिस्स्यावरुन काही महिन्यांपासून वाद होता, मात्र संगीताने घर विकण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून मंगळवारी त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर त्याने संगीता यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या गळ्यावर आणि पाठीवर तिक्ष्ण हत्याराने भोसकल्याच्या जखमा होत्या. ही माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच समीरचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच वाकोला पोलिसांच्या एका विशेष पथकाने समीरला वांद्रे येथून रात्री उशिरा अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More