कोस्टल रोड प्रकल्पाचे काम रोखले, प्रकल्प जैसे थे – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम रोखले, प्रकल्प जैसे थे

मुंबई –  राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मरिन ड्राईव्ह ते कांदिवलीच्या कोस्टल रोडचे काम उच्च न्यायालयाने आज रोखले. पुढील सुनावणी पर्यंत कोणतेही काम करून नका जैसे थे स्थिती ठेवा, असे आदेशच मुख्य न्यायमूर्ती  प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने महापालीका प्रशासनाला दिले. यापूर्वी न्यायालयाने वरळी जवळील भराव टाकण्याचे काम न्यायालयाने रोखले होते. आता कामच रोखल्याने  महापालीकेला दिवसाला 10 कोटी रुपयाचा भूरदंड पडणार आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांचा महत्वाकांक्षी असलेल्या मरिन ड्राईव्ह ते कांदिवलीच्या कोस्टल रोड प्रकल्पा विरोधात सोसायटी फॉर इुप्रुमेंन्ट या सामाजीक संस्थेच्यावतीने अनिकेत कुलकर्णी तसेच स्वेता वाघ युंनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावमीने अ‍ॅड. जनक द्वारकादास यांनी प्रकल्पाला  विरोध नाही तर पर्यावरणाचा होणार्‍या र्‍हासाला आमचा विरोध असल्याचे सांगताना राज्य सरकारने आणि पालीकेने हा महत्वकांक्षी प्रकला बाबत जनसुनावणी घेतलेली नाही अथवा संबंधीत खात्याची परवानगी ही घेतली नसताना प्रकल्पाचे काम सुरू केले, असा आरोप  केला. तसेच कोस्टल रोड मुळे सुमंद्रातील जैवी नष्ट होण्याची भिती व्यक्त केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More