कोस्टल रोडवरून सेना-भाजपात श्रेयवादाची लढाई – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोस्टल रोडवरून सेना-भाजपात श्रेयवादाची लढाई

मुंबई -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या उद्घाटानावरून सेना भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे, उद्या दिनांक, 16 डिसेंबर रोजी कोस्टल रोडचे भूमीपूजन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेकडून छापण्यात आलेल्या आमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव नसल्याने कोस्टल रोडच्या कामाचे संपूर्ण श्रेय शिवसेना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले, तर दुसरीकडे शिवसेना भवनासमोर कोस्टल रोड कामकाजाला परवाणगी मिळवून दिल्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, अशी सूची लिहलेले होर्डिंग लावून भाजपा कोस्टल रोडचे संपूर्ण श्रेय आपल्या खात्यात घेताना दिसत आहे.

तब्बल बारा हजार कोटी रुपयांचा दक्षिण मुंबई ते वरळी असा कोस्टल रोडचा प्रकल्प होणार आहे. गेल्या अडीच वर्षात कोस्टल रोड संदर्भात वेगवेगळ्या शाखांमधून एकूण 19 परवाणग्या मुख्यमंत्र्यांनी मिळवल्या. त्याचप्रकारे या प्रकल्पाला राज्यसरकराकडून देखील निधी मिळणार आहे, त्यामुळे कोस्टल रोड होण्यामागे मुख्यमंत्र्यांचा मोठा वाटा आहे, असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे, तर हा प्रकल्प मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे त्या रोडचे भूमीपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेना नेत्यांकडून देण्यात आली, त्याच बरोबर उद्या वांद्रे येथे होणाऱ्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व नेते, आमदार उपस्थित राहणार आहेत,

कोस्टल रोडच्या भूमीपूजनासाठी छापण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही. तर दुसरीकडे १८ तारखेला होणाऱ्या मेट्रो-३ च्या भूमीपूजनाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याने राजकीय वाद निर्माण होणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईच्या विकासातील महत्वाचा मानला जाणारा कोस्टल रोड भाजपा-शिवसेना यांच्या श्रेयवादात अडकल्याचे म्हटले जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More