कोळी समाजाचा धुळ्यात रास्ता रोको – eNavakal
News आंदोलन

कोळी समाजाचा धुळ्यात रास्ता रोको

धुळे – कोळी समाजाच्या विद्यार्थी आणि गरजूंना जातीचे दाखले तसेच जात पडताळणी दाखले मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या तरुणांच्या समर्थनात आज धुळे तालुक्यातील हेंद्रुण येथील ग्रामस्थांनी आनंदखेडा गावाजवळ रास्ता रोको करीत आंदोलन केले. 25 जून पासून कोळी समाजाचे युवक उपोषण करीत आहेत. प्रशासनाने त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे या युवकांचे प्राण संकटात आले आहेत. त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून न्याय द्यावा, अशी मागणी करीत नागपूर-सुरत महामार्गावर हेंद्रुण व आनंदखेडा गावातील कोळी समाजाच्या महिला-पुरूषांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुक कोंडी झाली होती. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करून आंदोलकांना हटविले आणि रस्ता मोकळा केला. या आंदोलनात शांताराम नवसारे, राजेंद्र नवसारे, संतोष नवसारे, राजेंद्र नवसारे, निर्मलाबाई कोळी, हेमराज जाधव, महेंद्र नवसारे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More