कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पाच कारखान्यांना जप्तीचा आदेश – eNavakal
महाराष्ट्र

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पाच कारखान्यांना जप्तीचा आदेश

कोल्हापूर – थकीत एफआरपीप्रश्नी कोल्हापूर आणि सांगलीतील पाच साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी जप्ती वसुलीचा आदेश काढला आहे. या पाच कारखान्यांची एकूण थकीत एफआरपी रक्कम 264 कोटी 9 लाख 90 हजार इतकी आहे. जप्ती आदेश काढलेल्या पाच कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आणि सांगली दोन साखर कारखान्यांचा समावेश आहे.

येत्या 23 एप्रिलपर्यंत ही थकीत रक्कम 15 टक्के व्याजासह या साखर कारखान्यांना भरावी लागणार आहे. तसे न झाल्यास या कारखान्यांवर जप्ती वसुलीची टांगती तलवार राहणार आहे. जप्ती आदेश काढलेल्या साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, भोगावती, पंचगंगा (रेणुका शुगर्स) आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालसुक्यातील माणगंगा व कवठे महांकाळ तालुक्यातील महाकाली या कारखान्यांचा समावेश आहे. थकीत रकमेपैकी सर्वात जास्त थकीत एफआरपी रक्कम वारणा कारखान्याची 115.92 कोटी इतकी आहे.

या प्रश्नावर ‘आंदोलन अंकुश’ने पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्याचबरोबर शासन निर्णयाप्रमाणे सरासरीऐवजी किलोमीटरप्रमाणे तोडणी वाहतूक खर्चाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या संघटनेने केली होती. त्यानंतर साखर आयुक्तांनी हा जप्ती आदेश काढला आहे. या सर्व कारखान्यांना ऊस (नियंत्रण) आदेश 1966 मधील तरतुदीनुसार गाळप केलेल्या ऊसाला 14 दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांना बील देणे बंधनकारक असताना या कारखान्यांनी अद्याप 31 मार्चअखेर एफआरपी दिलेले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पालघरमध्ये 5 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दाखल

वाडा- जिल्ह्यातील ज्या अतिदुर्गम भागात मोठी अ‍ॅम्ब्युलन्स जात नाही त्या ठिकाणच्या रुग्णांना आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 5 आरोग्य केंद्रांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

ग्रामीण भागातील चिंबोरी, मुठ्यांना शहरी भागात वाढली मागणी

विक्रमगड- पावसाळा सुरू झाला की सार्‍यांनाच वेध लागतात ते म्हणजे रानभाज्यांसोबत काळ्याभोर चिंबोर्‍या आणि खेकड्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणार्‍या चिंबोर्‍या आणि खेकडे विक्रमगड बाजारात तसेच...
Read More
post-image
News मुंबई

बेस्टमध्ये नवीन 500 कंत्राटी कामगारांची भरती

मुंबई,-बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात बेस्टच्या आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत प्रशासन आणि कमिटीने खासगी कंत्राटदाराकडून 500 नवीन कंत्राटी कामगार भरती केले आहेत. त्यामुळे गेले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पलुच्या धबधब्यावर 31 जुलैपर्यंत जाण्यास बंदी

विक्रमगड- जूनच्या शेवटच्या आठवडयात विक्रमगड व परिसरात दमदार असा पाऊस झाल्याने नदी, नाले, ओव्हळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतामध्ये पाणी साठलेले आहे व...
Read More
post-image
News महाराष्ट्र

म्हारळ हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड ‘ओव्हर फ्लो’

उल्हासनगर- कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डम्पिंग ग्राऊंड ओव्हर फ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डम्पिंग ग्राऊंड तयार...
Read More