कोल्हापूर शहर, मुंबई उपनगर, कोल्हापूर जिल्हा अजिंक्य – eNavakal
क्रीडा मुंबई

कोल्हापूर शहर, मुंबई उपनगर, कोल्हापूर जिल्हा अजिंक्य

मुंबई – बोरिवली पश्चिम येथील विभागीय क्रीडा संकुलात महाराष्ट्राचा शासनाच्यावतीने आणि राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात कोल्हापूर शहरने पुरुषांच्या ग्रीकोरोमन गटात मुंबई उपनगरने आणि महिलांच्या फ्री स्टाईल विभागात कोल्हापूर जिल्ह्याने सर्व साधारण विजेते पदाचा मान मिळवला. नामदार विनोद तावडे यांच्या हस्ते
स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. यावेळी नामवंत नरसिंग यादवदेखील उपस्थित होता. 3 दिवस चाललेल्या या स्पर्धेला राज्यातील कुस्तीपटूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. पुरस्कार समारंभाला आमदार मंगेश कुडाळकर, विजय गीरकर शशीकांत देशमुख, संपतराव साळुंखे, आणि बाळासाहेब लांडगे देखील उपस्थित होते.

स्पर्धेेचा निकाल (विजेते पहिलवान) फ्री स्टाईल – 57 किलो – ज्योतिबा अटकळे (सोलापूर जिल्हा), 61 किलो – सौरभ पाटील (कोल्हापूर शहर), 65 किलो – अक्षय हिरगुडे (कोल्हापूर जिल्हा), 70 किलो – शुभम थोरात (पुणे), 74 किलो – राकेश तांबुळकर (कोल्हापूर जिल्हा), 79 किलो अक्षय चौरघे (पुणे जिल्हा), 86 किलो – राजन सूळ (सातारा), 92 किलो – सिकंदर शेख (सोलापूर जिल्हा), 97 किलो – संतोष गायकवाड (अहमदनगर), 125 – किलो शुभम सिद्धनाळे (कोल्हापूर शहर),
ग्रीको रोमन – 55 किलो – अभिजीत पाटील (कोल्हापूर जिल्हा), 60 किलो – गोविंद यादव (मुंबई उपनगर), 63 किलो – विक्रम कुर्‍हाडे (कोल्हापूर जिल्हा), 67 किलो – प्रीतम खोत, (कोल्हापूर जिल्हा), 72 किलो – दिनेश मोकाशी (पुणे शहर), 77 किलो – गोकुळ यादव (मुंबई उपनगर), 82 किलो – मंगेश कराड (लातूर), 87 किलो – योगेश शिंदे (पुणे जिल्हा), 97 किलो – विवेक यादव 130 किलो शैलेश शेळके (लातूर).
महिला फ्री स्टाईल – 50 किलो – प्रगती ठोंबरे, 53 किलो – नंदिनी साळुंखे – (कोल्हापूर शहर), 55 किलो – स्वाती शिंदे (कोल्हापूर जिल्हा), 57 किलो – अंजली पाटील – सांगली, 59 किलो – सोनाली तोडकर (बीड), 62 किलो – अंकिता गुंड (पुणे जिल्हा), 65 किलो मनाली जाधव (ठाणे जिल्हा), 68 किलो – गीता चौधरी (भंडारा), 72 किलो – मनिषा दिवेकर (पुणे जिल्हा), 76 किलो – वर्षा राणी पाटील (मुंबई उपनगर)

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

322 पीएसआय पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा! भरती प्रक्रियेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 322 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत पूर्व आणि मुख्य परिक्षांतील आरक्षणाचा मुद्दा...
Read More
post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More