कोल्हापूरमध्ये ट्रक-जीपचा अपघात, बाळाचा जागीच मृत्यू – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये ट्रक-जीपचा अपघात, बाळाचा जागीच मृत्यू

कोल्हापूर – कोल्हापूरमधील हातकणंगले-वडगाव रोडवर सीमेंटचा ट्रक आणि जीपमध्ये जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जण गंभीर जखमी झाले असून दोन वर्षांच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास हातकणंगले-वडगाव रोडवर सीमेंटचा ट्रक आणि जीपमध्ये भीषण अपघात झाला आहे. हे सर्वजण नवविवाहित जोडप्याला घेऊन ज्योतिबा दर्शनासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एका 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेले सर्वजण कर्नाटकच्या बागलकोट येथील रहिवासी आहेत. या अपघातात चौघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More