कोल्हापूरच्या दौलत संघाला विजेतेपद- भुदरगड कबड्डी लीग – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

कोल्हापूरच्या दौलत संघाला विजेतेपद- भुदरगड कबड्डी लीग

गारगोटी – गेली तीन दिवस संपूर्ण भुदरगड तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या भुदरगड कब्बड्डी लीगमध्ये ‘दौलत संघ’ कोल्हापूर संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी तुल्यबळ असलेल्या राष्ट्रसेवक संघावर (तळसंदे) सामन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये बाजी मारत ‘भुदरगड कब्बड्डी लीगच्या’ मानाच्या चषकावर आपले नाव कोरले. यामध्ये राष्ट्रसेवक संघ (तळसंदे) उपविजेता ठरला, तर तृतीय क्रमांक िंहदवी कौलव व बालशिवाजी शिरोळ यांना विभागून देण्यात आला.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये ‘बेस्ट रेडर’ हिदवी संघ कौलवचा सौरभ पाटील, ‘बेस्ट डिफेंडर’ दौलत संघाचा अवधूत पाटील, तर ‘बेस्ट लीग प्लेयर’ दौलत संघाचा साईनाथ कोंडुसकर ठरला. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प. सदस्य अर्जुन आबिटकर, अनिरुद्ध रेडेकर, पांडुरंग खडके, जयश्री खडके, माजी सभापती बाबा नांदेकर, जगदीश पाटील, श्रीधर भोईटे, दयानंद भोईटे, साताप्पा निकाडे, लता भोईटे, दीपक देसाई, रवींद्र पाटील, विद्याधर परीट, गणेश मोरबाळे, योगेश भोईटे, सागर भोईटे, किरण भोईटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राम सुर्वे व पंकज तोडकर यांनी केले, तर संदेश भोईटे यांनी आभार मानले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More