कोल्हापूर – आज मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या २४ वर्षीय तरुणाने गोदावरी नदीपात्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान या तरुणाला बाहेर काढण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. याचेच पडसाद राज्य उमटले असून सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे, यावेळी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा मराठा समाजाने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ उद्यापासून ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तर 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी भव्य मोर्चा काढणार आहे.