कोल्हापुरातील मटणाच्या दराचा वाद पोहोचला हायकोर्टात – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापुरातील मटणाच्या दराचा वाद पोहोचला हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात ओळखला जाणारा पांढरा रस्सा आणि तांबडा रश्यासाठी लागणार्‍या मटणाच्या दराचा वाद हा आता न्यायालयात पोहचला आहे. मटण विक्रेत्यांना 360 ते 380 रुपये किलो दराने मटणाची विक्री करण्याची सक्ती करणार्‍या अन्यथा दुकान बंद करण्याची नोटीस देणार्‍या गारगोटी व कडगाव ग्रामपंचायती विरोधात मटण विक्रेत्यांच्या वतीने अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती बी.पी.धर्माधिकारी व न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी 11 डिसेबरला निश्‍चित केली.
ग्रामस्थांना गारगोटी व कडगाव ग्रामपंचायतीकडे मटण दरवाढीसंदर्भात तक्रारी केल्यानंतर ग्रामपंचायतीने गावातील सर्व मटण विक्रेत्यांना नोटीस पाठवून मटण अनुक्रमे 360 व 380 रुपये दरानेच विक्री करण्याचे बंधन घालताना अटी आणि शर्ती घातल्या. तसेच या अटींचे उल्लंघन केल्यास दुकानावर सीलबंद करण्याची कारवाई केली जाईल अशी नोटीस बजावली. त्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका अ‍ॅड.धैर्यशील सुतार यांनी न्यायमूर्ती बी.पी.धर्माधिकारी व न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंउपीठाच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी प्रमाणे पंचायतीला मटण विक्रीचा अधिकारच नसल्याचा दावा अ‍ॅड. सुतार यांनी या वेळी केला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावात मटणाचा दर सुमारे 560 ते 580 रुपये प्रती किलो आहेत याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना गारगोटी व कडगाव ग्रामपंचायतीनी अशाप्रकारची घातलेले बंधन बेकायदा असल्याचा दावा करताना नोटीस रद्दबातल ठरवून ग्रामपंचायतीने ह्या मटण विक्री व्यवसायात बेकायदेशीर हस्तक्षेप करू नये असा आदेश देण्याची विनंती केली. याची दखल घेत न्यायालयाने याचिकेची सुनावणी 11 डिसेबर रोजी निश्‍चित केली. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायत हद्दीत मटणाचे दर सुमारे 560 ते 580 रूपये प्रती किलो असा असताना गारगोटी व कडगाव ग्रामपंचायती ते 360 ते 380 रुपये प्रति किलो ठरविण्यात अधिकार नाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी प्रमाणे ग्रामंचायतीला मटण विक्रीचा अधिकारच नाही असा दावा मटण विक्रेत्यांनी याचिकेत
केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

देशातील नवे हॉटस्पॉट, मुंबईपेक्षा पुण्यात सर्वाधिक रुग्ण

पुणे – देशभरातून महाराष्ट्राभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्यातही मुंबईत कोरोनाने थैमान माजवले होते. मात्र, आता मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याची बाब...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्राणज्योत मालवली, रितेश देशमुखने दिली ट्विटरवरून माहिती

हैदराबाद – दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अभिनेता...
Read More
post-image
मनोरंजन

जॅकलीन फर्नांडीसने महाराष्ट्रातील दोन गावे घेतली दत्तक

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक बॉलीवुड कलाकारांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे आपल्या जन्मदिनी (11 ऑगस्ट), जॅकलीन फर्नांडीसने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन गावे,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

मलेशियात आढळला कोरोनाचा नवीन प्रकार, १० पटीने होतोय संसर्ग

जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा नवीन प्रकार मलेशियात सापडला आहे. धक्कादायक म्हणजे या विषाणूचा संसर्ग सध्याच्या विषाणूपेक्षा १० पट अधिक वेगाने होतोय.  या विषाणूचे नाव...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मॉल्स उघडली जातात मग मंदिरं का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई – राज्यातील मॉल्स उघडू शकतात तर मग मंदिरं का नाही, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे....
Read More