कोर्टाने स्थगिती दिल्यामुळेच आरक्षणाला उशिर – eNavakal
News आघाडीच्या बातम्या

कोर्टाने स्थगिती दिल्यामुळेच आरक्षणाला उशिर

मुंबई –  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,  यामुळे मराठा बांधवांनी आरक्षणासाठी कायदा हातात घेऊन आंदोलन करू नये.  तसेच आंदोलकांनी आपल्या जीवाचं बरं वाईंटं करून घेऊ नये, मागास आयोगाच्या अध्यक्षांनी आरक्षणाच काम जोराने करायला सुरुवात केली आहे. मात्र यापूर्वी कोर्टने स्थगिती दिल्यामुळेच आरक्षणाला उशीर झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबई येथील राजाराम महाराजांच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले की, अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा असे काहीजण म्हणतात. पण तसं केल्यासं ते आरक्षण एक दिवसही टिकणार नाही. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून राज्य सरकार या बाबी पूर्ण करत असल्याचेही फडणवीस यांनी  स्पष्ट केलं आहे.

हे सरकार कायमस्वरूपी टिकणार आरक्षण देण्याच्या विचारात आहे.  दडपणात असलेल्या लोकांना काही कळत नसतानाही ते बोलतात. असे फडणवीस म्हणाले.  तसेच जे आता काहीही बोलत आहेत, त्यांना हे भविष्यात नक्की कळेल. असंही ते म्हणाले.  स्वातंत्र्योत्तर काळात सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आमच्या सरकारने केला, मात्र कोर्टाने त्याला स्थगिती दिली. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र , वेळेनुसार याचा विसर झाला. असेही फडणवीसं म्हणाले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More