कोर्टाच्या आदेशाचा अवमानप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस – eNavakal
News मुंबई

कोर्टाच्या आदेशाचा अवमानप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस

मुंबई- कोर्टाच्या आदेशांचा अवमान केल्याप्रकरणी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांना मुंबई हायकोर्टाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मशिदींवरील बेकायदेशीर भोग्यांबाबत आदेश देऊनही कारवाई का नाही? असा सवाल विचारत हायकोर्टाने आज ही नोटीस आयुक्तांना बजावली. 23 ऑक्टोबरपर्यंत या नोटिसीला उत्तर देण्याचे आदेशही आयुक्तांना देण्यात आले आहेत.

संतोष पाचलाग यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोग्यांविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठानं सविस्तर निकाल दिलेला आहे. त्यानुसार आदेशांची पूर्तता न झाल्यानं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नका. प्रार्थनास्थळांवरीलही अवैध भोंगे काढा. ध्वनी प्रदूषणाविषयी जनजागृती करा. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करा, असे आदेश न्यायालयाने साल 2016 मध्येच दिलेत. मात्र अजूनही त्यांची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्याबद्दल शुक्रवारी हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढत्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1719 ध्वनी मापक यंत्रे घेऊन ती राज्यभरातील पोलीस ठाण्यांना दिली गेली आहेत. याद्वारे आवाज मोजून पोलीस संबंधितांवर कारवाई करतील, असे शासनाने त्यावेळी न्यायालयाला सांगितले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More