कोरोनामुळे अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित! – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

कोरोनामुळे अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित!

वॉशिंग्टन – कोरोना विषाणूचा फैलाव हा अमेरिकेतही होत असून अमेरिकन प्रशासनाने यावर चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आणीबाणीची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी  ५० अब्ज डॉलरची तरतूदही केली आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाईट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद बोलवली. ‘येणाऱ्या काळात कोरोनामुळे देशवासीयांना मोठी किंमत मोजावी लागेल. आता त्याग केला तर येणाऱ्या काळात त्याचा फायदा होईल, असं ट्रम्प म्हणाले. तसंच पुढील आठ आठवडे हे संकटाचे असतील, असेही सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत ११००हुन अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी अमेरिकेतील सर्व राज्यांना आपत्कालीन ऑपरेशन सेंटर तात्काळ सुरू करण्याचे आदेशही जारी केले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र राजकीय

खा. नवनीत राणा यांना पुन्हा कोरोना! पालिकेने केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना नुकताच मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र डिस्चार्ज दिल्यानंतर...
Read More
post-image
देश शिक्षण

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरील युक्तिवाद आणखी ३ दिवस चालणार

नवी दिल्ली – देशभरातील विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सर्वच राज्यांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी ‘ड्रीम ११’ कंपनी २२२ कोटी मोजणार

नवी दिल्ली – यंदा यूएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतीक्षित आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला असून ‘ड्रीम ११’ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. त्यासाठी ‘ड्रीम ११’...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या! कंगनाची मागणी

मुंबई – दिग्दर्शक करण जोहर याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या, अशी मागणी अभिनेत्री कंगना राणावत हिने केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन राजकीय

रिया कधीही आदित्य ठाकरेंना भेटली नाही! वकिलांचा खुलासा

नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या वकिलांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. रियाच्या वकिलांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती कधीही...
Read More