कोरेगाव-भीमा हिंसाचार! नवलखांवरील आरोपात प्रथम दर्शनी तथ्य नाही – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

कोरेगाव-भीमा हिंसाचार! नवलखांवरील आरोपात प्रथम दर्शनी तथ्य नाही

मुंबई – पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याच्या संशय असल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या पुरावे पहाता त्यांच्यावरील आरोपात प्रथमदर्शनी तथ्थ नाही. यात गोपनिय असे काही नाही, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केली या दंगलीनंतर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त करताना पुढील सुनावणीच्या वेळी 18 जनूला तपास अधिकार्‍यांला हजर रहाण्याचे आदेश दिले. तसेच तोपर्यंत नवलखा यांच्या घेण्यासाठी संशयास्पद विरोधात कारवाई न करण्याचे न्यायालयाने या पूर्वी पुणे पोलिसांना दिलेले आदेश
कायम ठेवले.
माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी नवलखा यांच्यावतीने अ‍ॅड. युग चौधरी यांनी बाजु मांडताना गौतम नवलखा हे एक पत्रकार आणि लेखक आहेत. देशातील संघर्षमय ठिकाणी जाऊन त्यांनी त्यावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अमर्त्य सेन यांनीही त्यांच्या पुस्तकांचे कौतुक केले आहे. एवढेच नव्हे तर काही वेळा त्यांनी काही ओलीस ठेवलेल्या पोलिसांची सुटका करण्यासाठी नक्षली आणि भारत सरकार यांच्यात वाटाघाटी करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. दोन्ही बाजूला चांगले संबंध असल्यामुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी विश्वासाने सोपवण्यात आली होती. त्यामुळे अशा व्यक्तीवरच शहरी नक्षलवाद पसरवल्याचा आरोप कसा होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या कार्यपध्दतीवरच
आक्षेप घेतला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More