कोयना धरणात 32.07 टीएमसी पाणीसाठा – eNavakal
News जीवनावश्यक महाराष्ट्र

कोयना धरणात 32.07 टीएमसी पाणीसाठा

कराड – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात येणारी पाण्याची आवक कमी होऊन ती प्रतिसेकंद 7 हजार 620 क्युसेक इतकी झाली आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा 32.07 टीएमसी झाला आहे.

गेल्या आठवड्यापासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त प्रमाणात होत असून अधूनमधून पाणलोट क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात येणारी पाण्याची आवक कमी होऊन ती प्रतिसेकंद 7 हजार 620 इतकी झाली. दरम्यान मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 82 (1133), नवजा 54 (1035) आणि महाबळेश्वर येथे 38(789) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.त्यामुळे मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 32.078 टीएमसी झाला तर धरणाची पाणीपातळी 2080.5 फूट आणि 634. 111 मीटर झाली आहे.
दरम्यान, पाटण तालुक्यातील पाटण, मोरगिरी, मणदूरे, तारळे, ढेबेवाडी आणि मल्हारपेठ विभागात ही आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता मात्र दिवसभर जोर मंदावला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More
post-image
News मुंबई

मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरची जागा का नको-हायकोर्ट

मुंबई – मुंबईतील संवेदनशील आरे कॉलोनीतील हजारो झाडांचा बळी घेऊन आणि पर्यावरणाचा र्‍हास करून मेट्रो कारशेड उभारण्या ऐवजी कांजूरमार्ग येथे मोकळ्या जागेचा पर्याय म्हणून...
Read More