कोपरीत जलवाहिनीतून दूषित पाणी – eNavakal
महाराष्ट्र

कोपरीत जलवाहिनीतून दूषित पाणी

ठाणे – ठाणे पूर्वेकडील कोपरी साईनाथनगर भागातील काही चाळींमध्ये नळावाटे जलवाहिनीतून दूषित पाणी येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेले तीन-चार दिवस दुपारच्या वेळेत अशा प्रकारे दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोपरी, साईनाथनगर परिसरात सुमारे 450 घरे आहेत. येथील रेल्वे स्थानकासमोरील ज्योत्स्ना इमारतीच्या पाठीमागील जोहराबाई चाळीमध्ये दुपारच्या सत्रात नळातून येणारे पाणी गढूळ असून, त्या पाण्याला मलमूत्राची दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत.
हे दूषित पाणी बाटलीत भरून ठाणे महापालिकेच्या कोपरी प्रभाग समिती कार्यालयातील पाणीपुरवठा विभागालाही दाखवल्याचे स्थानिक रहिवासी राजू पोवळे यांनी सांगितले.दरम्यान, दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी तातडीने लक्ष घालून पालिका अधिकार्‍यांकडे चौकशी केली. तर शिवसेनेचे पदाधिकारी हेमंत पमनानी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना सोबत घेत परिसरातील जलवाहिनीची पाहणी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More