कोकण रेल्वेचे गणेशोत्सवासाठीचे आरक्षण ‘या’ तारखेला खुले होणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या वाहतूक

कोकण रेल्वेचे गणेशोत्सवासाठीचे आरक्षण ‘या’ तारखेला खुले होणार

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्‍या जादा गाड्यांचे आरक्षण 29 एप्रिलपासून चाकरमान्यांसाठी खुले होणार आहे. तिकीट आरक्षण मिळविण्यासाठी होणारी चढाओढ कमी व्हावी यासाठी अतिरिक्त खिडक्यांची उपलब्धता मुंबईत करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्‍या गाड्यांचे नियोजन 15 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर सध्या उन्हाळी सट्ट्यांचे नियोजन सुरु आहे. पश्‍चिम रेल्वेतर्फे जादा गाड्या सोडल्या जातात. त्याचप्रमाणे सर्वाधिक मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात येतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशाचे आगमन होत आहे. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. पावसाचा कालावधी सुरु असल्यामुळे गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी चाकरमान्यांची तारांबळ उडते. रांगांच्या रांगा लावल्या जातात. त्यात काहींना आरक्षण मिळतच नाही. त्यांची गैरसोय दुर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने साडेचार महिने आधीच व्यवस्था केली आहे.

रेल्वेच्या नियमानुसार तीन महिने आधी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. त्यानुसार गणेशोत्सवात सुटणार्‍या गाड्यांसाठी 29 एप्रिल पासून आरक्षण करण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी दादरसह प्रमुख स्थानकांवर जादा तिकीट खिडक्याही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यामुळे तारखांचे नियोजन करुन आतापासून मुंबईकरांना कोकणात येण्यासाठी तिकीटे काढता येणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More