महाभियोग चौकशीच्या प्राथमिक अहवालात ट्रम्प दोषी – eNavakal
News विदेश

महाभियोग चौकशीच्या प्राथमिक अहवालात ट्रम्प दोषी

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेच्या संसदेत ‘महाभियोग’ची (इम्पियमेंट मोशन) चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या प्राथमिक अहवालात डोनाल्ड ट्रम्प हे दोषी आढळले आहेत. अमेरिकेच्या संसदेतील खालचे सदन असलेल्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंण्टेटिब्जच्या’च्या चौकशी अहवालात हा निष्कर्ष काढण्यात
आला आहे.
हाऊस ऑफ रिप्रेझेन्टोटिटजमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. डेमोक्रॅटस हे ट्रम्प यांचे विरोधक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे उच्च सदन असलेल्या अमेरिकेच्या सिनेटमध्ये बहुमत आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिब्जच्या चौकशी समितीने मंगळवारी आपला अहवाल सादर केला. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्या वैयक्‍तिक स्वार्थासाठी व फायद्यासाठी आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकाराचा दुरुपयोग केला. त्यांनी युक्रेन देशाचे राष्ट्रपती व्होलोडाइमर झेलेंस्की यांच्यावर दबाव आणून आपले प्रतिस्पर्धी जो बिडेन आणि त्यांचा मुलगा हंटर याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यास सांगितली. जो बेडेन हे 2020 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी आहेत. ते डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत. ट्रम्प यांनी परकीय देशावर दबाव आणून विरोधी पक्ष नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हे अमेरिकेच्या राज्य घटनेच्या विरोधात आहे. म्हणूनच ट्रम्पविरोधात महाभियोग सुरू आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

७०५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी जीव्हीकेचे अध्यक्ष व पुत्रावर गुन्हा

मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासात ७०५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष जी. वेंकट कृष्णा रेड्डी आणि त्यांचा मुलगा जीव्ही...
Read More
post-image
विदेश

बोत्सवाना देशात ३५० हत्तींचा रहस्यमय मृत्यू

गॅबोरोने – आफ्रिकेमधील बोत्सवाना देशात मागील काही दिवसांमध्ये ३५० हत्तींचे मृतदेह सापडले आहेत. जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या या हत्तींच्या मृतदेहांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सुशांतच्या सर्व लकी नंबरच्या गाड्यांचा लवकरच लिलाव?

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर आता त्याच्या गाड्यांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. सुशांतच्या गाड्या विकत घेण्यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. सुशांतने...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

बीड शहरात ९ जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन

बीड – बुधवारी बीड शहरात कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले. यातील एका रुग्णाने बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले. या रुग्णालयाच्या माध्यमातून...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोरोनाबाधा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात आता वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी...
Read More