कॉसमॉस बँक सायबर हल्ला; आणखी दोघांना पोलीस कोठडी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉसमॉस बँक सायबर हल्ला; आणखी दोघांना पोलीस कोठडी

पुणे – कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर हल्ला करून 94 कोटी रुपये लांबवल्याप्रकरणी सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखेने आणखी दोघांना काल अटक केली. औरंगाबाद आणि नांदेड येथून अटक केलेल्या या दोघांना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.के.खराडे यांनी दिले.

महेश साहेबराव राठोड (22) रा.धावरी दांडा, नांदेड आणि शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (28) रा. आयेशा मशिदीजवळ, मिर्झा कॉलनी, औरंगाबाद अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी भिवंडीच्या फहिम शेख (27) आणि औरंगाबादच्या फहिम खान (30) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पकडलेले जब्बार आणि राठोड हे दोघे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहेत. 95 बनावट डेबिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे कढताना ते सीसीटीव्हीत दिसल्याने त्यांची धरपकड केली आहे. त्यांनी बनावट डेबिट कार्ड कोठे तयार केले, बँकेचे सर्व्हर हॅक होणार आहे याची माहिती कशी मिळाली, तसेच हा गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असल्याने याचा सखोल शोध घेण्यासाठी या दोघांची पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा मुंबईत दाखल; गोरेगावमध्ये सभेचे आयोजन

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यासोबतच आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More
post-image
देश

भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

नवी दिल्ली – आज ‘लँडर विक्रम’च्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस होता. मात्र लँडर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही. उरली सुरली आशा संपल्यावर इस्त्रो’चे प्रमुख डॉ....
Read More