कॉलेजमध्ये मासिक पाळीत पाळला जातो धार्मिक शिष्टाचार, तपासली मुलींची अंतवस्त्रे – eNavakal
ट्रेंडिंग

कॉलेजमध्ये मासिक पाळीत पाळला जातो धार्मिक शिष्टाचार, तपासली मुलींची अंतवस्त्रे

68 girls in Bhuj college forced to remove undies, prove they weren't menstruating

भूज – मासिक पाळीत असताना धार्मिक शिष्टाचार पाळणे निव्वळ अंधश्रद्धा आहे, अशी शिकवण देण्यापेक्षा मुलींना मासिक पाळीत अस्पृश्य मानलं गेल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील एका महाविद्यालयात घडला आहे. हॉस्टेलच्या नियमानुसार मासिक पाळीत असलेल्या मुलींना धार्मिक कार्य वर्ज्य होती. मात्र तरीही विद्यार्थीनींकडून हा नियम पाळला न गेल्याने मुलींना मासिक पाळी आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांची अंतवस्त्रे तपासण्यात आल्याचा भयंकर प्रकार या महाविद्यालयात घडला आहे.
गुजरातमधील भुज येथे श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट २०१२ पासून चालवले जात आहे. या महाविद्यालयात बीकॉम, बीए आणि बीएससीचं शिक्षण दिलं जातं. या महाविद्यालयात एकूण १५०० विद्यार्थीनी शिक्षण घेत असून ६८ विद्यार्थीनी बाजूच्याच वसतीगृहात राहतात. या वसतीगृहात राहण्याकरता मुलींसाठी काही नियमावली आहे. त्या निमयावलीनुसार मासिक पाळीत मुलींनी धार्मिक कार्य करणं वर्ज्य आहे. मात्र तरीही अनेक विद्यार्थीनी हा नियम धुडकावत असल्याने वसतीगृह चालकाने याविरोधात कॉलेजमध्ये तक्रार दाखल केली. मासिक पाळीतील विद्यार्थींनीनी मंदिर, किचनमध्ये जाण्यास मनाई आहे. तसेच, या विद्यार्थींनीनी इतर विद्यार्थ्यांना शिवू नये अशी अनिष्ठ प्रथाही या हॉस्टेलमध्ये पाळली जाते. त्यामुळे वसतीगृह चालकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य रिता रानिंगा यांच्याकडे मुलींविरोधात तक्रार केली.
मुलींविरोधात केवळ तक्रारच नाही तर त्यांना भर वर्गातून त्यांना बाहेर काढले गेले. वसतीगृहात राहणाऱ्या ६८ विद्यार्थींनींना एका रांगेत उभे करण्यात आले. त्यांना सगळ्यांसमोर मासिक पाळी कोणाला आली आहे का, याविषयी विचारणा करण्यात आलं. मासिक पाळीत असलेल्या दोन विद्यार्थींनीना बाजूला ठेवण्यात आलं. त्यानंतर उरलेल्या ६६ मुलींना स्वच्छतागृहात नेण्यात आले. तेथे महिला प्राध्यापिकांनी विद्यार्थ्यांनींना अंतरवस्त्र काढायला लावून मुली खरच मासिक पाळीत आहेत की नाही याची खातरजमा करून घेतली.
मासिक पाळीतील धार्मिक शिष्टाचार पाळण्यावरून प्राचार्य, हॉस्टेलचालक आणि संचालक मंडळाकडून नेहमीच विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो. मुलींकडे सतत संशयाने पाहिलं जातं. मासिक पाळीत नसतानाही मुलींना सतत टीकेला सामोरं जावं लागतं. एवढंच नव्हे तर, खोटं बोलणाऱ्या विद्यार्थींनीना कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकीही देण्यात आली आहे. शिवाय, कॉलेजमधून काढताना कॉलेजमध्ये काहीच घडलं नसल्याच्या पत्रावरही सही करून घेण्यात येणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More