कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली – eNavakal
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. मात्र त्यांची ही ऑफर काँग्रेससह सीपीआय (एम) या पक्षांनी धुडकावली आहे. त्यामुळे ममतांना धक्का बसला आहे. याबाबत बोलताना वरिष्ठ काँग्रेस नेते अब्दुल मन्नान यांनी ‘भाजप विरोधातील संघर्षात आम्हाला ममतांकडून शिकण्याची गरज नाही’, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी ममतांच्या चुकीच्या धोरणामुळेच भाजपाने बंगालमध्ये मुसंडी मारली असून त्यांनी अगोदर स्वत: च्या चुकांमुळेच भाजप राज्यात मजबूत झाला, हे मान्य करायला हवे, असे म्हणत ममतांवर जोरदार टीका केली. तर सीपीएमचे नेते सुजान चक्रवर्ती यांनीही मन्नान यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवेळी राज्य विधानसभेत ममता यांनी, भाजप राज्यात समांतर सरकार चालविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत भाजप विरोधातील संघर्षात काँग्रेस-सीपीएम सारख्या पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More