कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीचे काँग्रेसचे नेते अहमद पटेल, खरगे आणि वेणुगोपाल हे आज मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता ही बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, ‘सत्तास्थापनेसंदर्भात शरद पवार यांना सर्वाधिकार देण्यात आले असून, एक समितीही स्थापन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बहुमत नाही. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. दिल्लीतून काँग्रेसचे नेते आले आहेत. ते शरद पवार यांच्याशी  चर्चा करणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,’ असं मलिक म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

भारतात २४ तासांत २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात हाहाकार माजवला आहे. देशात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली...
Read More
post-image
विदेश

अमेरिकेने डब्ल्यूएचओ सोडले! संघटनेवर चीनच्या वर्चस्वाचा आरोप

वॉशिंग्टन – कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून जागतिक आरोग्य संघटनेवर नाराज असलेल्या अमेरिकेने या संघटनेचा निधी बंद केल्यानंतर आता या संघटनेतून बाहेर पडल्याचा निर्णयच जाहीर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला २८ दिवसांचा फर्लो मंजूर! लवकरच घरी परतणार!

नागपूर – अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला पुन्हा एकदा 28 दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला मंगळवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये २४ तासांत सेनेच्या २ नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधीही आता त्याचे बळी ठरत आहेत. त्यात गेल्या २४ तासांत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील हॉटेल, लॉज आजपासून पुन्हा खुले होणार

मुंबई – महाराष्ट्रातील हॉटेल आणि लॉज आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स 33 टक्के क्षमतेसह चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, एखादे...
Read More