कॉंग्रेसला ७० वर्षांत जमले नाही, ते भाजपाने ७५ दिवसांत केले! – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

कॉंग्रेसला ७० वर्षांत जमले नाही, ते भाजपाने ७५ दिवसांत केले!

चंदिगढ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणाच्या जिंदमधून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत. जिंदमध्ये जाहीर सभा घेत त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. ‘कॉंग्रेसला जे ७० वर्षांत जमले नाही ते भाजपाने ७५ दिवसांत करून दाखवले आहे. मोदी सरकारने ७५ दिवसांत सरदार वल्लभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. ज्यांना मतांची लालच नाही तेच कलम ३७० हटविण्याचे काम करू शकतात’, असे ते म्हणाले. तसेच ‘हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणात भ्रष्टाचाराला ‘भूतकाळ’ बनवले आहे, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ७५ जागांनी मनोहर सरकार बनवा’, असे आवाहन शहांनी जनतेला केले.

अमित शहा म्हणाले, ‘कलम ३७० आता इतिहासात जमा आहे. तर चीफ डिफेन्स स्टाफमुळे युद्धादरम्यान तिन्ही दल एकत्र येऊन दुश्मनांचा सामना करतील, हे यापूर्वी कधीच झाले नव्हते. हे मोदी सरकारने करून दाखवले आहे. नौदल, हवाई दल आणि लष्कर एकत्र लढत नसल्याने त्यांची शक्तीही एकत्र येत नाही. सीडीएसमध्ये एकत्र येऊन लढल्यास त्यांची ताकद आणखी वाढेल. तसेच आम्ही शेतकऱ्यांसाठीही काम केले. मोदी सरकारने ७५ दिवसांत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना पेन्शन देण्याचे काम केले. जल मंत्रालयाची स्थापना केली. ज्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा हरियाणाचे उत्पन्न किती होते. आम्ही हरियाणात अनेक विकासकामे केली. हरियाणातील शहीद जवानांना कलम ३७० हटविण्यासारखी मोठी श्रद्धांजली असूच शकत नाही’, असे म्हणत शहांनी जनतेला मतदानाचे आवाहन केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More